आंबेगाव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी काथेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST2021-02-06T04:17:27+5:302021-02-06T04:17:27+5:30
मंचर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. जयश्री नीलेश मिडगे यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या ...

आंबेगाव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी काथेर
मंचर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. जयश्री नीलेश मिडगे यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर राजाराम काथेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, जिल्हा वसतिगृह उपाध्यक्ष नंदकुमार चासकर, राज्य सहचिटणीस जितेंद्र हांडे, जिल्हा महिला आघाडी कोषाध्यक्ष तनुजा पिंगळे, संघाचे नेते विजय घिसे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सरचिटणीस सुनील भेके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय वळसे पाटील, तालुका कोषाध्यक्ष संतोष गाढवे, उपसभापती चिमा बेंढारी ,मानद सचिव बाळासाहेब राऊत आदी उपस्थित होते.
संस्थेचे वसूल भागभांडवल १२ कोटी ९४ लक्ष , ठेवी २० कोटी ८५ लक्ष , बँक गुंतवणूक ७ कोटी ३७ लक्ष असून संस्थेने ९.६० टक्के दराने ३२ कोटी ६२ लक्ष कर्ज वाटप केलेले आहे. आकस्मित निधन झालेल्या सभासदाच्या वारसास १० लाख रुपये आर्थिक मदत केली जाते .संस्था सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी त्यांच्या वेतनानुसार सर्वसाधारण ५० लाख व आकस्मित ५० हजार तत्काळ कर्ज वाटप करत आहे. संस्थेच्या सभासदांसाठी मुदत ठेव, अल्प बचत ठेव व सभासद कल्याण निधी योजना राबवत आहे.
०४ मंचर काथेरे