खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कशीश जैन विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST2021-02-05T05:21:50+5:302021-02-05T05:21:50+5:30

पुणे : फिडे मास्टर कशीश जैन याने विनायक नवयुग मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन आयोजित बाराव्या ...

Kashish Jain wins open chess tournament | खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कशीश जैन विजयी

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कशीश जैन विजयी

पुणे : फिडे मास्टर कशीश जैन याने विनायक नवयुग मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन आयोजित बाराव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत १२ ते १८ वयोगटात सात गुणांसह विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेतील १२ ते १८ वयोगटाचा पारितोषिक वितरण समारंभ इंटरनॅशनल मास्टर जयंत गोखले, ऑर्बीटर राजेंद्र शिदोरे, दत्तात्रय खाडे, वर्धमान पुंगलिया यांच्या हस्ते झाले. या वेळी विनिता श्रोत्री, दीप्ती शिदोरे, सुनील पांडे, दत्तात्रय फंड, अभिजित मोडक, वरुण जकातदार, रमेश गिरमकर, दिनेश आंबुरे, योगेश जोगळेकर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, रोख पारितोषिक आणि पदके देण्यात आली.

कशीश जैनने सातही फेऱ्यांमध्ये बाजी मारली. त्याने सातव्या आणि अंतिमच्या फेरीत शार्दूल गोडबोलेवर विजय मिळवला. अनुज दांडेकर सहा गुणांसह दुसऱ्या, तर ओम लामकाणे साडेपाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. शार्दूल गोडबोले, केवल निर्गुण, प्रथमेश शेरला प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिले. स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात मेहफूज बशीर पठाण (५ गुण) तर १६ वर्षांखालील - मिहीर सरवदे (४.५ गुण) आणि १४ वर्षांखालील - केरा डागरिया (५ गुण) यांनी वैयक्तिक विजेतेपदाचा मान मिळविला.

Web Title: Kashish Jain wins open chess tournament