भातावर करपा तांबेरा व खोड किडा रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:12 IST2021-09-27T04:12:13+5:302021-09-27T04:12:13+5:30

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यांमध्ये भात या पिकांवर करपा तांबेरा व ...

Karpa Tambera and Khod Kida disease on rice | भातावर करपा तांबेरा व खोड किडा रोग

भातावर करपा तांबेरा व खोड किडा रोग

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यांमध्ये भात या पिकांवर करपा तांबेरा व खोड किडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात शेती धोक्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ५७ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रापैकी ५४ हजार १०१ हेक्टर क्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. यातील ४ हजार८२१ हेक्टरवर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली आहे. प्रत्येक वर्षी आदिवासी शेतकरी हा रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळात धुळवाफेवर भार पेरण्या होतात. मात्र या वर्षी रोहिणी मृग नक्षत्रापाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसु (कोर) या नक्षत्रातही पावसाने चांगलीच साथ दिली. भात पेरणी केलेला वरचा दाणा व माती आड झालेला गेलेला दाणा उतरुण येऊन भात रोपे चांगल्या प्रकारे तरारली होते. शेतकऱ्यांनी लागवडी उरकून घेतल्या या नंतर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही झाला. यामुळे अतिपाण्यामुळे भात रोपे सडली. तर काही ठिकाणी बांध फुटून भात खाचरे गाडली गेली. या नंतर गेले वीस ते २५ दिवसांपासून या भागामध्ये दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भात पिकांवर करपा तांबेरा व खोड किडा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात पिके जळू लागली आहेत. ह्या रोग पडल्यानंतर पुढील लक्षण जाणवत आहेत.

करपा :- भातरोपांची पाती ही पिवळी पडून जळू लागतात.

तांबेरा :- या रोगामध्ये भातरोपांची पाती ही तांबडी पडून सुकू लागतात.

खोड किडा :- हा किडा रोपाच्या मुळामध्ये शिरुन पूर्ण भातरोप पोखरतो.

—————————————————

चौकट

या भागात राहणारा आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यातून भात एकमेव पीक काढतो. भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. गेले कित्येक वर्षांपाून निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात शेती संकटात सापडल्याचे चित्र आहे. भात पिकांना करपा, तांबेरा व खोड किड्याने ग्रासल्याने सगळीकडे भात रोपे तांबडी, पिवळी पडली आहेत.

चौकट

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे या तिनही खोऱ्यांमध्ये भात पिकांना करपा, तांबेरा व खोड किड्याने या रोगांनी ग्रासल्याने भात पीक अत्यंत पिवळी व तांबडी पडून जळून गेली आहेत. प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन कृषी विभागामार्फत या भागातील भात पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

फोटो ओळ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये भात या पिकांवर करपा तांबेरा व खोड किडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात शेती धोक्यात आली आहे.

Web Title: Karpa Tambera and Khod Kida disease on rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.