कर्नाटक हापूस दाखल
By Admin | Updated: January 30, 2017 03:13 IST2017-01-30T03:13:01+5:302017-01-30T03:13:01+5:30
कर्नाटक हापूस आंबा यंदा महिनाभर आधीच शहरात दाखल झाला आहे. अद्याप आवक खूप कमी असली तरी त्यामुळे पुणेकरांना हापूसची चाहूल लागली आहे

कर्नाटक हापूस दाखल
पुणे : कर्नाटक हापूस आंबा यंदा महिनाभर आधीच शहरात दाखल झाला आहे. अद्याप आवक खूप कमी असली तरी त्यामुळे पुणेकरांना हापूसची चाहूल लागली आहे. मार्च महिन्यापासून कर्नाटक हापूसची नियमित आवक सुरू होईल, असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
कर्नाटकमधील तुमकूर येथून गुलटेकडी येथील मार्केट यार्डात उरसळ यांच्या गाळ््यावर शुक्रवारपासूून कर्नाटक हापूसची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी ३३ बॉक्स, तर रविवारी ४४ बॉक्सची आवक झाली. रविवारी बाजारात आलेल्या चांगल्या प्रतीच्या हापूसला दीड डझनामागे १२०० रुपये भाव मिळाला. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कर्नाटक हापूसची आवक हळूहळू सुरू होते. यंदा मात्र महिनाभर आधीच हापूस बाजारात आला आहे. कर्नाटकच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आंब्याला लवकर फळधारणा झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र ही आवक सातत्यपूर्ण राहणार नाही. मार्च महिन्यापासून आवक वाढत जाईल, असे उरसळ यांनी सांगितले.