कर्मयोगी साखर कारखान्याचे वजन काटे अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:29+5:302021-01-13T04:25:29+5:30

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस वजन काटे अचुक असलेचा दाखला भरारी ...

Karmayogi sugar factory weight cut accurate | कर्मयोगी साखर कारखान्याचे वजन काटे अचूक

कर्मयोगी साखर कारखान्याचे वजन काटे अचूक

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस वजन काटे अचुक असलेचा दाखला भरारी पथक निरीक्षक व वैधमापन शास्ञ विभाग यांचे पथकाने दिला.

वैधमापन विभागाचे वजन मापे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे आदेशानुसार ( दि. ९ जानेवारी २०२१) रोजी दुपारी भरारी पथकाने अचानक कर्मयोगीच्या ऊस वजन काटयांची तपासणी पुणे वैधमापन निरीक्षक .

एस. एन कव्हरे, इंदापूर वैधमापन निरीक्षक एच. एस. शेख, या भरारी पथकाने केली.

संबंधित पथकातील प्रतिनिधींनी ऊसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणित असलेबाबत फिरत्या वाहनांव्दारे कसून तपासणी करुन पडताळणी केली. त्यावेळी कर्मयोगीचे सर्व ऊस वजन काटे अचूक असलेचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पडताळणी प्रमाणपञ कारखान्यास सादर केले.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कामकाज कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारंच कारखान्याचे पारदर्शकपणे चालविले जाते. ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील असलेला विश्वास हीच कर्मयोगी परिवारासाठी मोठी प्रेरणा असल्याचे कारखान्याचे वतीने कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार व संसदीय कार्यमंञी हर्षवर्धन पाटील, व्हाईस चेअरमन श्रीमती पद्माताई भोसले व संचालक मंडळ यांचे वतीने जाहीर करण्यात आले.

सदर पडताळणीमुळे पुन्हा एकवेळ कर्मयोगी कारखान्याने सभासदांची, ऊस उत्पादक सभासदांची विश्वासार्हता जपणूक करीत असलेचे दाखवून दिले आहे. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, मुख्य शेतकी अधिकारी एस.जी कदम, वर्क्स मॅनेजर ए.सी. पोरे, शेती अधिकारी के.एन. हिंगमिरे, केनयार्ड सुपरवायझर एस.जे. यादव, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी तसेच संतोष पुंड, आबा करे हे ऊस उत्पादक सभासद यावेळी उपस्थित होते

कर्मयोगी साखर कारखान्यावर वजनकाटा तपासणी करताना वैधमापन खात्याचे अधिकारी

Web Title: Karmayogi sugar factory weight cut accurate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.