करबुडव्या हॉटेल, पबवर ‘खबऱ्यांची’ नजर
By Admin | Updated: December 22, 2016 02:08 IST2016-12-22T02:08:01+5:302016-12-22T02:08:01+5:30
नववर्षांच्या स्वागतासाठी शहर व ग्रामीण भागातील हॉटेलस्, फॉर्म हाऊस आणि पब्जची जयत तयारी सुरु असून आतापर्यंत ३५ आयोजकांनी

करबुडव्या हॉटेल, पबवर ‘खबऱ्यांची’ नजर
पुणे : नववर्षांच्या स्वागतासाठी शहर व ग्रामीण भागातील हॉटेलस्, फॉर्म हाऊस आणि पब्जची जयत तयारी सुरु असून आतापर्यंत ३५ आयोजकांनी कार्यक्रमासाठी परवानगी घेतली आहे. परंतु दर वर्षी शहर आणि जिल्ह्यात हजारो पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना परवानग्या केवळ १०० ते १५० आयोजक घेतात. त्यामुळे यंदा खास खब-याच्या मार्फत कर बुडविणा-या आयोजकांवर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी सांगितले. कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)