करंजविहीरेला आले ‘शासन आपल्या दारी’

By Admin | Updated: March 28, 2017 23:51 IST2017-03-28T23:51:56+5:302017-03-28T23:51:56+5:30

शासनाच्या विविध विभागांना एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय निर्माण करणे अतिशय अवघड बाब असते, तरीदेखील

Karanjvi came to 'the government' | करंजविहीरेला आले ‘शासन आपल्या दारी’

करंजविहीरेला आले ‘शासन आपल्या दारी’

आंबेठाण : शासनाच्या विविध विभागांना एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय निर्माण करणे अतिशय अवघड बाब असते, तरीदेखील नागरिकांना विनात्रास विविध दाखले किंवा अन्य कागदपत्रे जागेवर मिळावीत, यासाठी खेड तहसीलने ६ शिबिरांत जवळपास ३२ हजार नागरिकांना लाभ दिला आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार रजा राखीवच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी करंजविहीरे (ता. खेड) काढले.
शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत महसूल विभागाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या विस्तारित समाधान योजनेच्या शिबिराच्या कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी रजा राखीवच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, खेडचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, मंदा शिंदे, धोंडाबाई खंडागळे, रोहिदास गडदे, महसूल नायब तहसीलदार बी. बी. बोडके, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, सहायक निबंधक हर्षित तावरे,
भूमी अभिलेखचे उपअधीक्षक सूरज कावळे, रामदास भोईर, संजय रौंधळ, नवनाथ दरेकर, करंजविहीरे गावचे सरपंच गणपत कोळेकर, उपसरपंच कैलास बोऱ्हाडे, नीलेश घोडके, पाईटचे मंडलाधिकारी एच. ए. सोनावणे, बी. आर. जाधव, एस. एस. आमोलिक, के. एस. मगर, एम. एच. राऊत, बी. एस. राठोड यांच्यासह तालुक्याच्या पश्चिम भागातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी महसूल विभागाच्या वतीने एकूण १४ प्रकारचे लाभ देण्यात आले. यात डोंगरी विभागाचे ५७२ दाखले, डोमिसाईलचे ४६५ दाखले, शेतकरी असल्याचे ३१६ दाखले, जातीचे ८६ दाखले, जुन्या काळातील परंतु सध्या अस्तित्वात नाहीत, अशा सोसायटीचा बोजा कमी करून
इतर अधिकारामधील बोजा करण्याचा फायदा ३५३ शेतकऱ्यांना, कुळकायदा कलम ४३ कमी करण्याचा फायदा ३२ शेतकऱ्यांना, संजय गांधी योजनेचे धनादेश वाटप ९
लाभार्थ्यांना, संजय गांधी लाभ मंजूर आदेश ३ लाभार्थ्यांना, रेशनकार्डवाटप १३०८ नागरिकांना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रांताधिकारी सुनील गाढे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, रोहिदास गडदे, पांडुरंग मरगज यांनी विचार व्यक्त केले.
तहसीलदार सुनील जोशी यांनी प्रास्ताविक केले. संजय कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सोसायटी संचालक रघुनाथ शिवेकर यांनी आभार मानले.

सहकार विभागाच्या वतीने ९७४ शेतकऱ्यांना भागदाखला वाटप, २२० शेतकऱ्यांना रूपे कार्ड वाटप, तर आसखेड खुर्द येथील ३१९ शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारामधील चुकलेली नावे दुरुस्त करून देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या वतीने ५० पिशव्या बियाणेवाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने ८० लोकांची तपासणी करण्यात आली. महिला बचत गटाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर १०० कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Karanjvi came to 'the government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.