भाजप महिला मोर्चाच्या वतीने कँडल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST2021-09-16T04:15:21+5:302021-09-16T04:15:21+5:30

महिलांवरील अत्याचारावर कठोर कायदा व ॲट्रॉसिटी कायदा अमलात आणावा, अशी मागणी राजगुरूनगर शहरात काढलेल्या कँडल मार्च व तहसीलदार कार्यालयावर ...

Kandal Morcha on behalf of BJP Mahila Morcha | भाजप महिला मोर्चाच्या वतीने कँडल मोर्चा

भाजप महिला मोर्चाच्या वतीने कँडल मोर्चा

महिलांवरील अत्याचारावर कठोर कायदा व ॲट्रॉसिटी कायदा अमलात आणावा, अशी मागणी राजगुरूनगर शहरात काढलेल्या कँडल मार्च व तहसीलदार कार्यालयावर काढलेल्या मोर्चात भाजपच्या वतीने करण्यात आली. या वेळी झालेल्या निषेध व मृत्युमुखींना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी भाजप महिला सचिव संगीता जगताप, नगरसेविका संपदा सांडभोर, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष मालिनी शिंदे, शहराध्यक्षा दीप्ती कुलकर्णी, रिया सांडभोर, स्वाती सांडभोर, सिंधू वेळापुरे, रत्ना पिंगळे, चैतन्य संस्थेच्या रेखा क्षोत्रीय यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा संघटक कालिदास वाडेकर, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, उपाध्यक्ष दत्ता सांडभोर, भाजप कायदा आघाडी तालुका अध्यक्ष ॲड. प्रदीप उमाप, सरचिटणीस ॲड. प्रितम शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे उपस्थित होते.

१५ राजगुरुनगर

मागण्यांचे निवेदन तहसीलदार वैशाली वाघमारे यांना देताना भाजपच्या महिला पदाधिकारी.

Web Title: Kandal Morcha on behalf of BJP Mahila Morcha