कांबळे, मावळे, शेख, पाल प्रथम

By Admin | Updated: January 19, 2015 01:58 IST2015-01-19T01:58:43+5:302015-01-19T01:58:43+5:30

देहूरोड लायन्स क्लबच्या वतीने रविवारी झालेल्या स्वच्छ भारत संदेश दौड, मॅरेथॉन स्पर्धेत हर्षला कांबळे, रोहन मावळे यांनी लहान गटात

Kamble, Mavale, Sheikh, Pal first | कांबळे, मावळे, शेख, पाल प्रथम

कांबळे, मावळे, शेख, पाल प्रथम

किवळे : देहूरोड लायन्स क्लबच्या वतीने रविवारी झालेल्या स्वच्छ भारत संदेश दौड, मॅरेथॉन स्पर्धेत हर्षला कांबळे, रोहन मावळे यांनी लहान गटात, सोफिया शेख व गजानन पाल यांनी मोठ्या गटात तर ज्येष्ठ नागरिक संघ गटात पंढरीनाथ सानप यांनी प्रथम क्रमांक मिळविला. चार गटात झालेल्या या स्पर्धेत देहूरोड परिसरातील पंधरा शाळांतील सोळाशे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पधेर्तील प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना अनुक्रमे टॅबलेट पीसी, सायकल व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे.
देहूरोड लायन्स क्लबच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून मेरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सकाळी साडेआठला सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे संचलन झाल्यानतर सव्वा नऊ वाजता देहूरोड बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ खान, एमजेएफ लायन डॉ विक्रांत जाधव, अध्यक्ष जोगिंदर भाटिया, बोर्डाच्या सदस्या अरुणा पिंजण, सदस्य गोपालराव तंतरपाळे, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू यांचे हस्ते स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सुरवातीला लहान गटातील मुलींची व मुलांची स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर मोठ्या गटातील मुलींची व मुलांची स्पर्धा झाली. या स्पधेर्नंतर यंदा प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा घेण्यात आली. स्पधेर्साठी इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुली व मुलांचे दोन स्वतंत्र लहान गट तसेच आठवी ते दहावीच्या मुले व मुलींसाठी दोन मोठे गट करून स्पर्धा घेण्यात आली आहे. लायन्स क्लब शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा-झांज पथकाने स्पर्धकांचे ढोलाच्या गजरात स्वागत केले.
देहूरोड लायन्स क्लबचे अध्यक्ष जोगिंदर भाटिया, स्पर्धा प्रमुख नरेंद्र महाजनी, सचिव संजय माळी, शाळा समिती अध्यक्ष काशिनाथ जाधव, लायन नागेश गायकवाड, नरेंद्र डोईफोडे, अवतारसिंग कांद्रा, अशोक खैरे, श्रीरंग सावंत, आर. के. शर्मा, गुरुमेलसिंग राजू, हंबीर आवटे, मारुती दांगट, सुशीला नारवाल यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले व संयोजन केले. देहूरोड पोलीस व लष्करी पोलिसांनी व्यवस्था
ठेवली होती. (वार्ताहर)

Web Title: Kamble, Mavale, Sheikh, Pal first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.