शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणी देशपांडेनी हनुमान जयंतीनिमित्त केलेला पूजेचा अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:17 IST

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या कुख्यात कल्याणी देशपांडेनी हनुमान जयंतीनिमित्त बाणेर येथील मंदिरात पूजेसाठी परवानगी मिळण्याबाबत केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च देण्याचीही तयारी अर्जात नमूद

पुणे : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या कुख्यात कल्याणी देशपांडेनी हनुमान जयंतीनिमित्त बाणेर येथील मंदिरात पूजेसाठी परवानगी मिळण्याबाबत केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.महात्मे यांनी हा आदेश दिला आहे.        देशपांडे हिने केलेल्या अर्जामध्ये काहीही तथ्य नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रावरून ती एका टोळीची प्रमुख असल्याचे दिसून येत आहे, असा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे (वय ४६, रा. बालाजी निवास, पाषण-सूस रस्ता) हिच्यावर शहरातील डेक्कन, कोथरूड, हिंजवडी, विश्रांतवाडी, चतु:श्रृंगी, हवेली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिला ८ आॅगस्ट २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणात तिचे साथीदार रवि उर्फ प्रदीप रामहरी गवळी ( वय २७, रा. कंदलगाव, मोहोळ, सोलापूर), रवि शिवाजी तपासे ( वय २८) यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती.               देशपांडेच्या वतीने अ‍ॅॅड. विद्याधर कोसे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात म्हंटले आहे की, तिने २०१४ साली हनुमानाचे मंदिराचे नुतनीकरण केले. तेव्हापासून हनुमान जयंती साजरी करत असून यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च देण्याचीही तयारी आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास त्याचा कोणताही दुरुपयोग करणार नसल्याचे अर्जात नमूद क रण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या अर्जास विरोध केला होता. त्यानुसार न्यायालायने हा अर्ज फेटाळला.                

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाCourtन्यायालय