‘लोणी काळभोर येथे ‘शासन आपल्या दारी’

By Admin | Updated: November 9, 2015 01:33 IST2015-11-09T01:33:21+5:302015-11-09T01:33:21+5:30

शासन अनेक लोकाभिमुख योजना राबवित आहे; परंतु याबाबतची माहिती सर्वसामान्यांना नसते. म्हणून या कामासाठी शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे मारल्यावर

'At the Kalbhor' | ‘लोणी काळभोर येथे ‘शासन आपल्या दारी’

‘लोणी काळभोर येथे ‘शासन आपल्या दारी’

लोणी काळभोर : शासन अनेक लोकाभिमुख योजना राबवित आहे; परंतु याबाबतची माहिती सर्वसामान्यांना नसते. म्हणून या कामासाठी शासकीय कार्यालयात अनेक हेलपाटे मारल्यावर, त्यांचा वेळ व पैसे खर्च होतो. हा सर्व खटाटोप टाळण्यासाठी, ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या माध्यमातून आपली कामे कमी वेळात करून घ्या, असे आवाहन आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले.
तालुका प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे ‘शासन आपल्या दारी’-‘समाधान योजना’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. याचे उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार, संदीप कोहिनकर, तात्यासाहेब काळे, बाजीराव सायकर, प्रभाकर जगताप, रत्नाबाई भोसले, गौरी गायकवाड, हिरामण काकडे, योगेश कुटे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
ही कामे तालुका पुरवठा अधिकारी तेजस्वी पारखी, मंडलाधिकारी संतोष सोनवणे, तलाठी विष्णू चिकणे, रतन कांबळे, मिलिंद शेट्टी, संतोष चोपदार, अशोक शिंदे, शिवाजी देशमुख, विस्तार अधिकारी सुनील जाधव, ग्रामविकास अधिकारी ए. व्ही. कुंभार, एम. पी. चव्हाण, बापूसाहेब कुदळे, कृषी पर्यवेक्षक मनीषा पावडे, कृषी सहायक बालाजी पाटील, पशुधन पर्यवेक्षक काशिनाथ लाड, सहायक लागवड अधिकारी चारूशीला काटे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कल्याण गिरी, सहायक अभियंता विकास पानसरे, भालचंद्र जाधव, वसंत भेरूड, अभिराज कोडिलकर, डॉ. काळे या अधिकाऱ्यांनी ही योजना सफल होण्यासाठी सहकार्य केले.

Web Title: 'At the Kalbhor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.