कळस : कळस-लोणी देवकर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र सदर काम सुरू असतानाच हा रस्ता उखडला आहे. काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर काम थांबवून चौकशी करण्याची मागणी कळस ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश खारतोडे यांनी केली आहे.
कळस- लोणी देवकर या रस्त्यावरील कळस रुई या टप्प्यात काम सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करण्यात येणार आहे. मात्र सखलता न राखता ओढ्याच्या ठिकाणी भरावही करण्यात आले नाहीत. पुलांची नव्याने कामे न करता जुन्या जीर्ण व लहान मोरी पुलांवरच काम उरकण्यात येत आहे. दलदलीच्या ठिकाणी मुरुमीकरण न करता आहे. त्याच परिस्थितीत साईटपट्टी वाढवून निकृष्ट दर्जाचे मुरुम, माती, खडीचा वापर करुन काम दर्जाहीन करण्यात येत आहे. पावसामुळे साईटपट्टी अनेक ठिकाणी वाहून गेली आहे काळी माती चोपन मातीचा वापर जास्त केल्याने रुंदीकरण निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाबीर देवस्थान आहे. तसेच तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे सतत वाहनांची वर्दळ असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२२ कळस
कळस - लोणी देवकर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे.
220821\inshot_20210821_161730203.jpg
कळस ता इंदापुर फोटो