शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पु.ल.देशपांडे उद्यानात उभारण्यात येणार कलाग्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 20:19 IST

बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेतीन एकरमध्ये ६ कोटींचा प्रकल्प  कला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणारनिविदा पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेपेक्षा २४.८६ टक्के कमी

पुणे: सिंहगड  रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानात महापालिकेच्या वतीने  कलाग्राम उभारण्यात येणार आहे. उद्यानातील तब्बल साडे तीन एकरमध्ये ६ कोटींचा प्रकल्प असून, मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या कामासाठी ५६ लाख ३५ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.    पुणेकरांना, पर्यटकांना देशभरातील विविध राज्यांच्या लोककला व ग्रामीण कलासंस्कृती एकाच छताखाली पाहता यावा, यासाठी  सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. याबाबत मुळीक यांनी सांगितले , पु.ल.देशपांडे उद्यानाताली ३५ एकर जागेपैकी साडे तीन एकरमध्ये हे कलाग्राम उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्प ६ कोटी रुपयांचा असून, यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी रुपये व खासदार अनिल शिरोळे यांनी स्थानिक विकास निधीतून ७५ लाख रुपये कलाग्राम प्रकल्पासाठी दिले आहेत.     सिंहगड रस्त्यांवरील पानमळा येथील ३५ एकर जागेत महापालिकेने साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उद्यान विकसित केले आहे. जपानी शैलीचे गार्डन, मोगल शैलीचे गार्डन आणि ग्रामीण कला मांडणारे कलाग्राम साकारण्याचे नियोजन तीन टप्प्यात करण्यात आले होते. यापैकी पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून तिस-या टप्प्यात कलाग्रामची निर्मिती करण्यात येणार आहे.बांबू व दगडापासून तयार होणा-या विविध वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी ३० गाळे, एॅपीथिएटर आदी सुविधांचा कलाग्राममध्ये समावेश करण्यात येणार आहे. विविध राज्यांतील लोककला व ग्रामीण कलासंस्कृतीची एकाच ठिकाणी माहिती मिळणार आहे. हौशी व नवोदीत कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी प्रशासनाने निविदा प्रकिया राबविली होती. यामध्ये तीन ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या. त्यापैकी मंगलमूर्ती डेव्हलपर्स यांची निविदा पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या रकमेपेक्षा २४.८६ टक्के कमी दराने आली. ती सर्वात कमी होती. त्यामुळे या ठेकेदाराकडून ५६ लाख ३५ हजार रुपयांचे काम करून घेण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका