शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 06:50 IST

आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले हाेते,  तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत पोलिस विभागाची बैठक घेतली. 

पुणे : कल्याणीनगर येथील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात पोलिसांकडून कडक कारवाई करून ३०४ कलम लावले होते. आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी आणि पोलिस कोठडी मिळावी, असा बालन्याय मंडळाकडे  अर्ज केला होता. मात्र, बालन्याय मंडळाने अर्ज फेटाळत जामिनाचा निर्णय घेतला. ताे पोलिसांसाठी धक्कादायक होता, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले हाेते,  तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत पोलिस विभागाची बैठक घेतली. 

बालन्याय मंडळ फेरविचार करेल पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बालन्याय मंडळाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते. 

त्यामुळे कायद्यानुसार, ती कारवाई करण्यात येत आहे. निश्चितपणे बालन्याय मंडळ फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे, असेही फडणवीस म्हणाले.

ग्राहकांच्या पिण्यावर नियंत्रण आणा -‘पबमध्ये ज्या ग्राहकांना अल्कोहोल दिले जाते, त्यानंतर ग्राहक काय करतात, यासाठी तुम्हीही जबाबदार आहात. क्लबमध्ये येणारे घरी चालत जातीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे अशा ग्राहकांच्या पिण्यावर मर्यादा घाला किंवा त्यांच्यासोबत ड्रायव्हर असल्याची खात्री करा. काहीच नसेल तर क्लबच्या आवारातच त्यांना झोपायला सांगा.’ अशा शब्दांत सत्र न्यायालयाने मंगळवारी बारमालकांना फटकारले. 

‘त्यांना’ चार दिवसांची पोलिस कोठडी कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्यविक्री केल्याप्रकरणी ‘कोझी’ हॉटेलचे मालक नमन भुतडा (२५, पद्मविलास पॅलेस, वानवडी), व्यवस्थापक सचिन काटकर (३५, रा. साईसदन, तुकाईनगर, हडपसर), हॉटेल ‘ब्लॅक’चे असिस्टंट मॅनेजर संदीप सांगळे ( ३५, रा. केशवनगर, मुंढवा) यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातCourtन्यायालय