सुभाष जगताप यांच्यामुळे पीएमपी कामगारांना न्याय

By Admin | Updated: October 1, 2014 00:35 IST2014-10-01T00:35:38+5:302014-10-01T00:35:38+5:30

गेल्या काही वर्षापासून पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचा:यांच्या मागण्यांकडे राजकारणी मंडळी व प्रशासनाचे दुर्लक्ष होते;

Justice of the PMP workers due to Subhash Jagtap | सुभाष जगताप यांच्यामुळे पीएमपी कामगारांना न्याय

सुभाष जगताप यांच्यामुळे पीएमपी कामगारांना न्याय

>पुणो : ‘गेल्या काही वर्षापासून पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचा:यांच्या मागण्यांकडे राजकारणी मंडळी व प्रशासनाचे दुर्लक्ष होते; परंतु महापालिकेचे सभागृह नेते झाल्यानंतर सुभाष जगताप यांनी पीएमपी कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे पहिलांदाच या वर्षी दिवाळीअगोदर कामगारांना दिलासा मिळाला आहे,’ असे कौतुक राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन (पीएमपी)चे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी केले.  
पर्वती मतदार संघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सुभाष जगताप यांनी पीएमपी कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कामगार युनियनच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार विणकर सभागृहात नुकताच करण्यात आला. त्या वेळी आयोजित कामगार मेळाव्याला राष्ट्रवादी युनियनचे उपाध्यक्ष कैलास पासलकर, खजिनदार नाना निवंगुणो, अनंता कदम, बाळासाहेब चव्हाण, बाळू मते, हरिश ओव्हाळ, बाबा व विकास मते आदी कामगार मंडळी उपस्थित होती. 
पीएमपी कामगारांच्या सुट्टय़ा, वेळेवर पगार, गणवेश व पदोन्नतीचे अनेक मूलभूत प्रश्न रखडले होते, त्यासाठी कामगार युनियनने अनेकदा आंदोलने केली. मात्र, महापालिका प्रशासन दाद देत नव्हते. सभागृह नेते सुभाष जगताप यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सर्व प्रश्नांचा अभ्यास केला. कामगार संघटनेचे पदाधिकारी व अधिका:यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर महापालिकेच्या विविध विषय समित्यांकडे पाठपुरावा केला, त्यामुळे पीएमपी कामगारांचे पगार, पदोन्नती, रोजंदारी भरती व सानुग्रह अनुदानाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जगताप यांच्यासारखे नेतृत्व पर्वती मतदारसंघाला आमदार म्हणून मिळाले पाहिजे, त्यासाठी पीएमपी कामगार संघटना जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणो उभी राहणार आहे, असे आश्वासन सुनील नलावडे यांनी दिले. 
 
कामगारांचे पाठीराखे..
सुभाष जगताप हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे, त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व कामगारांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत, त्यामुळे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात. जगताप हे कामगारांचे पाठीराखे असणारे नेतृत्व आहे, असे गौरवोद्गार कैलास पासलकर यांनी मेळाव्यात काढले.  

Web Title: Justice of the PMP workers due to Subhash Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.