बस कारला धडकून दोन ठार
By Admin | Updated: March 16, 2015 00:13 IST2015-03-15T22:44:06+5:302015-03-16T00:13:19+5:30
वेळेजवळ अपघात : मृतांत आरोग्यसेवक संघटनेच्या अध्यक्षांचा समावेश

बस कारला धडकून दोन ठार
भुर्इंज : पुणे-बंगलोर महामार्गावर वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत कारला व्हॉल्व्हो बसने पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघेजण ठार झाले. मृतांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन भोसले व आरोग्य सहायक महेश वाघमारे यांचा समावेश असून, अन्य दोनजण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, भोसले, वाघमारे व इतर दोघे शनिवारी कार (एमएच ११ ७७९४)मधून कामानिमित्त पुण्याला गेले होते. रात्री ११.३० च्या सुमारास परतताना वाटेत हॉटेलमध्ये त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर दुभाजक ओलांडून सातारच्या दिशेने वळत असताना पाठीमागून आलेल्या बसने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, कारमधील चौघेही बाहेर फेकले गेले व कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी जाळीवर आदळली. नितीन भोसले यावेळी कार चालवीत होते. त्यांना शिरवळ येथील जगताप हॉस्पिटलमध्ये, तर महेश वाघमारे यांना कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी हलविण्यात आले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कारमधील दत्ता यादव (रा. कामाठीपुरा, सातारा) व संजय क्षीरसागर (रा. कृष्णानगर, सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. (आणखी वृत्त ३ वर)
सीसीटीव्ही
फुटेज तपासणार
वेळेचे सरपंच दशरथ पवार व गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या शोधासाठी भुर्इंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक गजानन मोरे यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. तसेच, महामार्गावर आनेवाडी येथे असलेल्या टोलनाक्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे, असे भुर्इंज पोलिसांनी सांगितले.