शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

केवळ तीन महिन्यांतच घटस्फोटाचा दावा निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 02:49 IST

अपवादात्मक निर्णय; आधीपासून वेगळेगळे राहत असल्याने सहा महिन्यांची अट शिथिल

पुणे : वैचारिक मतभेदांमुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा केवळ तीन महिन्यांत निकाली काढण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आधीपासून दोघे वेगळेगळे राहत होते. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला.कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा दावा निकाली काढला. तुषार आणि हेमा (नावे बदलली आहेत) या दोघांनी घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. त्यांचे आॅक्टोबर २०१४मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगाही आहे. तुषार हा सरकारी नोकर असून हेमा उच्चशिक्षित व पुण्यातील एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर काम करते. दोघांनाही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. लग्नानंतर त्यांचे वैचारिक मतभेद झाल्यामुळे एकमेकांशी सूर जुळत नव्हते. त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली. त्यानंतरही दोघांचे पटेनासे झाल्यावर घटस्फोट मिळावा म्हणून त्यांनी दावा दाखल केला.हेमाला नोकरीसाठी इंग्लंडला जायचे होते. तेथील प्रकल्पात तिला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तर, तुषारचीदेखील बदली होणार होती. त्यामुळे त्यांनी परस्परसंमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा ३ महिन्यांत निकाली निघाला. न्यायालयाने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यात ६ महिन्यांचा कालावधी वगळून हा घटस्फोट अर्ज मान्य केला.अ‍ॅड. शशिकांत बागमार, अ‍ॅड. निनाद बागमार यांच्यामार्फत हा दावा दाखल करण्यात आला होता.दोघांनाही पुण्यात थांबणे नव्हते शक्यनोकरीनिमित्त हेमा इंग्लंडला जाणार होती, तर तुषारची दुसºया शहरात बदली होणार होती. त्यामुळे दोघांनाही पुण्यात थांबणे शक्य नव्हते. त्यांच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. घटस्फोट मिळण्यासाठी लागणारा सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात यावा, असा अर्ज त्यांनी दिला. अपवादात्मक परिस्थितीत घटस्फोट मिळण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी वगळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यानुसार न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत दोघांचा अर्ज मान्य केला.अशी आहे सहा महिन्यांची तरतूदहिंदू विवाह कायद्याप्रमाणे पती-पत्नी परस्परसंमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी ते एकमेकांपासून एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी वेगळे राहत असतील, तर घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करू शकतात.हा अर्ज निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत थांबण्याची तरतूद कायद्यात आहे.मात्र, अपवादात्मक परिस्थितीत सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात यावा, असा आदेश या दाव्यात न्यायालयाने दिला.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप