बस देखभालीचे काम आता रात्रीच

By Admin | Updated: April 15, 2017 04:11 IST2017-04-15T04:11:49+5:302017-04-15T04:11:49+5:30

महानगर परिवहन मंडळाकडील (पीएमपी) बसची देखभाल व दुरुस्तीची (मेंटेनन्स) बहुतांश कामे रात्रीच होण्यासाठी वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्यांमध्ये

Just a night of maintenance | बस देखभालीचे काम आता रात्रीच

बस देखभालीचे काम आता रात्रीच

पुणे : महानगर परिवहन मंडळाकडील (पीएमपी) बसची देखभाल व दुरुस्तीची (मेंटेनन्स) बहुतांश कामे रात्रीच होण्यासाठी वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. ६० टक्के कर्मचाऱ्यांनी रात्रपाळी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिवसा दुरुस्तीसाठी बस बंद ठेवल्या जाणार नाहीत.
पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून
तुकाराम मुंढे यांनी पीएमपी प्रशासनात बदल करण्याचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत बदल, कामचुकारांना निलंबित करण्यात आले. शुक्रवारी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
बसच्या देखभाल-दुरुस्तीचे जास्तीत जास्त काम रात्रीच्या वेळी पार पडावे, असे नियोजन करण्यात आले आहे. वर्कशॉपमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचाऱ्यांना रात्री १० ते सकाळी ६ अशी ड्युटी लावण्यात आली आहे. सकाळी ६ ते दुपारी अडीच या वेळेत २० टक्के व दुपारी २ ते रात्री साडेदहा या वेळेत
२० टक्के कर्मचारी सेवा बजावतील. शिफ्टचा कालावधी हा १५ दिवसांचा असेल.
बसची सर्व्हिसिंग करण्याची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही निश्चित करण्यात आली आहे. सकाळी व दुपारच्या वेळी केवळ रनिंग मेंटेनन्सची कामे केली जातील. इतर सर्व देखभाल-दुरुस्तीची कामे ही रात्रीच्या वेळेत होतील. प्रत्येक शिफ्टमध्ये जेवणाची वेळ ४ तासांनंतर अर्ध्या तासाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्रपाळीसाठी दोन सुपरवायझर नेमले जाणार आहेत.
(प्रतिनिधी)

ते १७४ कर्मचारी अखेर पीएमपीत रुजू
पीएमपीच्या सेवेत असलेले; मात्र अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असलेल्या १७८ कर्मचाऱ्यांपैकी १७४ कर्मचारी अखेर पीएमपीच्या डेपो, वर्कशॉपमध्ये रुजू झाले आहेत. मात्र, रुजू झाल्यानंतर त्यातील काही जण रजेवर गेले आहेत, तर ४ जण अद्याप रुजूच झाले नाहीत. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
बालेवाडी आगारात १३ कर्मचारी, प्रशासन विभागात ६, स्वारगेट आगार ५, कात्रज २०, निगडी ३, पिंपरी ५, मार्केट यार्ड ९, मध्यवर्ती यंत्रशाळा स्वारगेट ३०, हडपसर २२, कोथरूड १५, स्वारगेट १८, न.ता. वाडी ७, पुणे स्टेशन ११, भोसरी २, निगडी यंत्रशाळा १२ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत.

बसवाटपाचे
अडीच महिन्यांचे शेड्युल्ड तयार
चालक व वाहकांना कोणती बस द्यायची, याबाबतचे पुढील अडीच महिन्यांचे शेड्युल्ड निश्चित करण्यात आले आहे. चालक व वाहकांना चांगली बस उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेतली जात असल्याने त्यावर हा उपाय काढण्यात आला आहे.
पीएमपीच्या ताफ्यामध्ये काही चांगल्या, तर काही दुरवस्था झालेल्या बस आहेत. टाइमकीपर आणि गॅरेजकीपर यांच्याकडून चांगल्या बससाठी पैसे घेतले जात होते.

Web Title: Just a night of maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.