शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

केवळ वातावरण बदलावर चर्चा करून उपयोगाची नाही : मेधा पाटकर  

By नम्रता फडणीस | Updated: December 11, 2024 16:09 IST

केवळ वातावरण बदलावर चर्चा करून उपयोगाची नाही, असे मत जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

पुणे ‘महिलांची शक्ती मोठी असते. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार आपण खैरलांजी, हाथरस येथील अत्याचारांच्या घटनांमध्ये न्याय मागण्यासाठी जाऊ शकतो. लोकशाही वाचविण्यासाठी ग्रामसभा महत्त्वाची आहे. कोणीही भुके असता कामा नये या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची संवेदनशीलता कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. केवळ वातावरण बदलावर चर्चा करून उपयोगाची नाही, असे मत जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयच्या नेत्या मेधा पाटकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जिल्हा प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने ‘जागर मानवी हक्काचा अभियान’ कार्यक्रमात पाटकर बोलत होत्या. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी. जे. पाटील, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, ॲड. शार्दूल जाधवर, विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, डॉ. बबन जोगदंड या वेळी उपस्थित होते.पाटकर म्हणाल्या, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामध्ये बदल झाले तरच मानवाधिकार सुरक्षित राहील. विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा का द्यावा लागत आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. समाजात पसरलेली जातीची आणि धर्माची नशा थांबविणे गरजेचे आहे. त्यामुळे मानवता नष्ट होत आहे. ब्रिटीश काळातील कायदे बदलण्याला आमचा विरोध नाही. मात्र, राज्यघटनेच्या चौकटीमध्ये समता, न्यायाच्या दिशेने कायदे बदलणे गरजेचे आहे,. दारुच्या विक्रीतून मोठा महसूल मिळत असल्याने दारूबंदी कायद्याची मागणी दुर्लक्षित केली जाते. त्याउलट दारूचे दोनशे परवाने महिलांना दिले गेले. अशा वातावरणात मानव अधिकार वाचविण्यासाठी न्यायपालिकेने निकाल द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.’बापट म्हणाले, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली. मात्र, केवळ भारतात लोकशाही जिवंत राहिली. पंतप्रधान जेव्हा शक्तिशाली होतात, तेव्हा लोकशाही व हक्काला धोका निर्माण होतो. जोपर्यंत नागरिक सतर्क असतील, तोपर्यंत हा धोका टाळता येईल.’

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMedha Patkarमेधा पाटकर