जुन्ररच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:11 IST2021-02-07T04:11:23+5:302021-02-07T04:11:23+5:30
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेशकुमार गोंदवले, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल व राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ...

जुन्ररच्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेशकुमार गोंदवले, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल व राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, कोरोना काळात सर्व बंद असताना फक्त दवाखाने आणि ऑनलाईन शिक्षण सुरू होते. पिढी घडविणारा शिक्षक हाच खरा देशाचा रक्षक आहे. ऑनलाईन पाठात सर्वात जास्त लाईक आणि विव्हर्स असलेल्या शिवरायांचे बालपण या ऑनलाईन पाठाच्या वेळी प्रत्यक्ष शिवनेरी वर जाऊन पाठ घेणाऱ्या व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभूती देणाऱ्या जुन संजय रणदिवे या शिक्षकांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी संगीता ढमाले, साईनाथ कनिंगध्वज, प्रशांत ढवळे, भारती आल्हाट, संतोष डुकरे, प्रशाली डुकरे, ज्योती तोरणे, भाग्यश्री बेलवटे, धनश्री आतकरी, पुष्पलता डोंगरे, अनिता टिकेकर, उज्वला नांगरे, दिपश्री पठाडे, ललिता वाघ, कीर्ती चव्हाण, उत्तम सदाकाळ, संतोष पन्हाळे, संतोष शिंदे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.