शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरचा मनसेचा एकमेव आमदार सोनवणे निघाले शिवसेनेच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:43 IST

राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पुणे : राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे दबावतंत्र वापरून जि. प. गटनेत्या आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीस गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याने या पदाधिकाऱ्यांना कोणतेही म्हणणे सादर न करताच माघारी यावे लागले. ठाकरे यांनी पदाधिकाºयांच्या राजीनाम्याच्या दबावतंत्राला दाद न दिल्याने आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेनाप्रवेशास हिरवा कंदील दिला असल्याचे मानले जात आहे. येत्या आठ दिवसांत आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता असून आमदार सोनवणे यांचा प्रवेश झाला तर आशाताई बुचके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार सोनवणे यांच्या प्रवेशापूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयांना मातोश्रीवर बोलाविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मातोश्रीवर त्यांना पाचारणदेखील करण्यात आले होते. सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या आशाताई बुचके यांच्या सर्व समर्थकांनी नारायणगाव येथील विश्रामगृहावर बैठक घेऊन आमदार सोनवणे यांच्या शिवसेनाप्रवेशास विरोध दर्शविला. जर सोनवणे यांना प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती, तसेच अनेक पदांवर काम करणाºया शिवसैनिकांनी सामूहिकरीत्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. याबाबत वृत्तपत्र व सोशल मीडियावर जुन्नर तालुक्यात शिवसेनेत फूट पडणार, तसेच लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी झळकल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी काल दि. ५ मार्च रोजी मातोश्रीवर भेटण्यासाठीगेले होते.।वरिष्ठांकडून जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाºयांची कानउघाडणीआशाताई बुचके यांनी वैयक्तिक भेट मागितली असता उद्धव ठाकरे यांनी ‘मला तुमच्याशी बोलायचे नाही,’ असे म्हणत भेट देण्यास नकार दिला. तसेच हॉलमध्ये येऊन सर्व पदाधिकाºयांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आशाताई बुचके यांना राजीनाम्याच्या दबावतंत्रावर खडे बोल सुनविले. मीडियामार्फत आपण केलेले वक्तव्य पक्षाला अशोभनीय आहे. आपण पक्षापेक्षाही मोठ्या झाल्या आहात. तुम्ही तालुक्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा. त्यानंतर आपणास भेटण्यास टाईम देऊ, असे स्पष्ट केले, बेशिस्तपणा चालणार नाही, अशी तंबीही पदाधिकाºयांना दिली. जुन्नर तालुक्यातून राजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिकाºयांची उद्धव ठाकरे यांनी हवा काढून घेतल्याने आशाताई बुचके व त्यांचे समर्थक एकाकी पडले आहेत. आमदार सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे त्यांना मिळालेल्या वागणुकीवर स्पष्ट झाल्याने आता आशाताई बुचके यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या आठ दिवसांत माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, संभाजी तांबे, राजाभाऊ गुंजाळ, नगराध्यक्ष शाम पांडे व काही निवडक पदाधिकाºयांनामातोश्रीवर बोलावून आमदार सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयाचे नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

टॅग्स :MNSमनसे