जुन्नरचा चावंड किल्ला झाला चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:14+5:302021-02-05T05:09:14+5:30
फाउंडेशनच्या सदस्यांनी जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक व जीर्ण झालेल्या संपूर्ण चावंड किल्ल्याची साफसफाई केली. खराटे, झाडू, फावडे, ...

जुन्नरचा चावंड किल्ला झाला चकाचक
फाउंडेशनच्या सदस्यांनी जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक व जीर्ण झालेल्या संपूर्ण चावंड किल्ल्याची साफसफाई केली.
खराटे, झाडू, फावडे, खोरे, टोपल्या आदी साहित्यांची जमवाजमव करून सकाळी ७ वाजता साफसफाईला प्रारंभ करण्यात आला. किल्ल्यावरील वाळलेले गवत,पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात फेकलेले कागद व प्लास्टिक कचरा गोळा करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावून तेथील पायवाटा व गडाच्या पायऱ्या स्वच्छ करण्यात आल्या. दुर्लक्षित असलेल्या चावंड गडावरील निखळलेले काही दगड पूर्ववत बसविण्यात आले तर तेथील गवताने वेढलेले पुरातन ‘पुष्करणी’ नामक पाण्याचे तळे स्वच्छ करून सदरेवरील गवत काढण्यात आले. अल्प प्रमाणात पडझड झालेल्या ठिकाणाची जुजबी दुरुस्ती देखील करण्यात आली. येथील पवित्र चामुंडा देवीचे मंदिर व परिसर स्वच्छ करण्यात आला. काटेरी झुडपे, वाळलेल्या गवताने व कचऱ्याच्या साम्राज्याने वेढलेल्या चावंड किल्ल्याने साफसफाई झाल्यावर कित्येक वर्षांनी मोकळा श्वास घेतला.
२८ ओतूर