जुन्नर-नाणेघाट मार्गाची दुरवस्था
By Admin | Updated: July 9, 2015 23:33 IST2015-07-09T23:33:44+5:302015-07-09T23:33:44+5:30
जुन्नर-नाणेघाट या नवीन रस्त्याची एका वर्षातच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याने कामाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

जुन्नर-नाणेघाट मार्गाची दुरवस्था
नारायणगाव : जुन्नर-नाणेघाट या नवीन रस्त्याची एका वर्षातच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याने कामाची चौकशी करावी व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर चौकशी समिती नेमून त्यांच्यावर एका महिन्याच्या आत कडक कारवाई करावी व रस्ता
तातडीने दुरुस्त करावा़; अन्यथा पुण्यातील सिंचन भवन येथे अधिकारी व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचाराविरुद्घ घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे रस्ते साधन-सुविधा आस्थापनाचे तालुकाध्यक्ष गणेश शेळके यांच्यासह उपाध्यक्ष सचिन
बढे, रमेश पाटोळे, विभागप्रमुख सतीश पाटे, आशिष वाजगे यांनी दिला आहे़
जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात पुरातन काळाची साक्ष देणारा नाणेघाट आहे़ या ठिकाणी पर्यटकांची सदैव वर्दळ असते़ जुन्नर-घाटघर-नाणेघाट मार्गावर चावंड, हडसर व जीवधन या किल्ल्यांकडे जाणारा मार्ग आहे़ या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम याच वर्षी पूर्ण झाले असून, उर्वरित घाटघर-नाणेघाट रस्त्याचे काम सुरू आहे़ परंतु, पहिल्याच पावसात रस्ता ठिकठिकाणी वाहून गेला आहे.
ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता खचला आहे़ तसेच साईटपट्ट्यादेखील निकृष्ट पद्धतीने भरल्या गेलेल्या आहेत. १२ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांत मिळून आस़ आऱ. प्रोग्रॅम, आदिवासी बजेट या माध्यमांतून पूर्ण झाले असून त्यावर २ ते ४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे़