जुन्नर, भोर, वेल्हा, पुरंदरचा मृत्यूदर जिल्ह्यात सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:00+5:302021-05-08T04:10:00+5:30

कठोर उपाययोजनांची गरज : फिवर क्लिनिक सर्वेक्षणात आढळले ६ हजार ७४७ रुग्ण लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात ...

Junnar, Bhor, Velha, Purandar have the highest mortality rate in the district | जुन्नर, भोर, वेल्हा, पुरंदरचा मृत्यूदर जिल्ह्यात सर्वाधिक

जुन्नर, भोर, वेल्हा, पुरंदरचा मृत्यूदर जिल्ह्यात सर्वाधिक

Next

कठोर उपाययोजनांची गरज : फिवर क्लिनिक सर्वेक्षणात आढळले ६ हजार ७४७ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात गुरुवारी पुणे आणि पिंपरीच्या तुलतेत सर्वाधिक रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांपासूनचा ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढता राहिला आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर हा १.३ टक्के आहे. मात्र, जुन्नर तालुक्याचा २.४, भोर तालुक्याचा २.३, वेल्हा तालुका २.०, तर पुरंदर तालुक्याच्या मृत्यूदर हा १.८ आहे. या चार तालुक्यांचा मृत्यूदर जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात कोरोनासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी दिली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना शोधण्यासाठी तालुकानिहाय क्रियाशील प्रतिबंधित क्षेत्र तयार केले जात आहे. या सोबतच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. यासोबतच फिवर क्लिनिक तयार करण्यात आले असून त्याद्वारे रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत ६ हजार ७४७ कोरोनाबाधितांचा शोध घेण्यात आला आहे. या सोबतच आशा सेविकांच्या सर्वेक्षणाची सातवी फेरी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. १ मार्चपासून त्यांनी ६ हजार ५ रुग्णांचा शोध घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्त असला तरी एकूण जिल्ह्याचा मृत्यूदर हा कमी आहे. मात्र, काही तालुक्यात हा सर्वाधिक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राधान्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले. जुन्नर, भोर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्याचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. येथील रुग्णांना तातडीची आरोग्य सुविधा देण्यासाठी कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तसेच लसीकरण माेहीमही वेगवान करण्याचा प्रयत्न आराेग्य विभागातर्फे सुरू आहे.

जुन्नर तालुक्यात आतापर्यंत १० हजार ७५२ कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी २ हजार २८९ रुग्ण हे क्रियाशील आहेत. तर २६२ रुग्णांच्या मृत्यूमुळे कोरोना मृत्यूदर २.४ एवढा आहे. भोर तालुक्यात ३ हजार ८० बाधित आहेत. त्यातील ९११ क्रियाशील आहेत. तर ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

फिवर क्लिनिक सर्वेक्षणात हवेली, इंदापूर, मावळ, शिरूर तालुका मागे

जिल्ह्यात १३ तालुक्यांत १२० फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले. या क्लिनिकद्वारे आतापर्यंत १२ लाख ३४ हजार ५१३ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ४५ हजार ८६२ संशयित रुग्ण आढळले. त्यांची तपासणी केली असता ६ हजार ७४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. फिवर सर्वेक्षणाचा चांगला फायदा होत असला तरी हवेली, मावळ, इंदापूर, शिरूर या तालुक्यांनी यात योग्य कामगिरी न केल्याने सर्वेक्षण योग्य झाले नाही.

चौकट

तालुकानिहाय क्रियाशील रुग्ण, मृत्यू व मृत्यूदर

तालुका एकूण कोरोनाबाधित क्रियाशील रुग्ण एकूण मृत्यू मृत्यूदर

आंबेगाव १०,९१२ १६९१ १६९ १.५

बारामती ११२९९ ३०८२ ८३ ०.७

भोर ३०८० ९११ ७२ २.३

दौंड ८७४३ २१२७ ११४ १.३

हवेली ५११२० २२०४ ६२० १.२

इंदापूर १०३८३ ३५३९ ११२ १.०

जुन्नर १०७५२ २२८९ २६२ २.४

खेड १४२३८ २२७८ १९५ १.३

मावळ ७४८३ १०७३ ११७ १.५

मुळशी १४९४७ ३२५९ १८५ १.२

पुरंदर ६३५७ १६३९ ११५ १.८

शिरूर १६१७४ ३१०२ २१८ १.३

वेल्हा १३२७ २४० २७ २.०

एकूण १६६८१५ २७४३४ २२८९ १.३

Web Title: Junnar, Bhor, Velha, Purandar have the highest mortality rate in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.