युवकाच्या धाडसामुळे अपघात करणारा गजाआड
By Admin | Updated: August 25, 2014 05:23 IST2014-08-25T05:23:08+5:302014-08-25T05:23:08+5:30
युवकाने जीव धोक्यात घालून दाखविलेल्या धाडसामुळे अपघात करणारा चालक गजाआड झाला.

युवकाच्या धाडसामुळे अपघात करणारा गजाआड
आळंदी : युवकाने जीव धोक्यात घालून दाखविलेल्या धाडसामुळे अपघात करणारा चालक गजाआड झाला.
आळंदी फुलगावफाटा या महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळी अपघात करुन सुसाट वेगाने टेम्पो पळून जात होता. सचिन परशुराम भिवरे (रा. मरकळ, ता. खेड) या युवकाने दाखविलेल्या धाडसामुळे आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, कुमार कदम बीट अमलदार डी. एन. दगडे मरकळ ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी फुलगावफाटा या महामार्गावर मरकळ गावच्या हद्दीत मद्यप्राशन केलेल्या टेम्पो चालकाने तीन जणांना जोरात धडक दिली. त्यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर एक युवक गंभीर जखमी असून एका युवकाची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर भोसरी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिन भिवरे हा चंदननगरवरुन मरकळ कडे येत असतांना भीषण अपघात करुन टेंम्पो चालक वेगाने टेम्पो घेवून पळून जात होता. सचिन भिवरे यांनी आपल्या अल्टो या गाडीतून टेंम्पोचा पाठलाग करण्यास सुरवात केली. परंतु फुलगावच्या हद्दीत टेंम्पो चालकाने अल्टो या गाडीस जोरात कट मारला . भिवरे यांनी न घाबरता सहा किलोमीटर पाठलाग करुन टेंम्पो फुलगावफाटा येथे पकडला. व टेंम्पो चालकास लोणीकंद पोलीस ठाणे येथे घेवून गेला. त्याने टेम्पो चालकाचे हात-पाय बांधून स्वत: टेंम्पो चालवून चालक नारायण सुधाकर यायीळे (रा. लातुर) यास आळंदी पोलीसांच्या ताब्यात दिले.