पत्रकार हल्लाविरोधी कायदा लवकरच
By Admin | Updated: January 13, 2015 05:46 IST2015-01-13T05:46:03+5:302015-01-13T05:46:03+5:30
पत्रकारांना प्रामाणिकपणे व निर्भीडपणे काम करता यावे, यासाठी येत्या अधिवेशनात पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.

पत्रकार हल्लाविरोधी कायदा लवकरच
पुणे : पत्रकारांना प्रामाणिकपणे व निर्भीडपणे काम करता यावे, यासाठी येत्या अधिवेशनात पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष गोविंद घोळवे, राज्य संघटक संजय भोकरे आदी उपस्थित होते.
या वेळी उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांना उद्योगरत्न, अजिंक्यदेव आणि मधू कांबीकर यांना कलारत्न, वासुदेव गरुड यांना धर्मरत्न, मयूर पाटील व विकास गायकवाड यांना समाजरत्न, योगेश शेलार यांना युवारत्न, आशा भटेवरा व राज गायकवाड यांना विशेष समाजरत्न, तर प्रशांत जगताप व मोनिका मोहोळ यांना कार्यक्षम नगरसेवक, ‘लोकमत’चे हणमंत पाटील व दीपक जाधव यांना कार्यक्षम पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
सहकारमंत्री पाटील यांनीही पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यास सहमती दर्शवून कायदा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. संघाचे शहराध्यक्ष विठ्ठल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)