चेष्टामस्करीत त्याने चावा घेऊन तोडली करंगळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:45+5:302020-11-26T04:27:45+5:30
पुणे : मित्रांबरोबर गप्पा मारत असताना चेष्टा मस्करीत एकाने तरुणाच्या हाताच्या करंगळीला इतका जोरात चावा घेतला की ...

चेष्टामस्करीत त्याने चावा घेऊन तोडली करंगळी
पुणे : मित्रांबरोबर गप्पा मारत असताना चेष्टा मस्करीत एकाने तरुणाच्या हाताच्या करंगळीला इतका जोरात चावा घेतला की त्याच्या करंगळी नखासह बोटापासून वेगळी झाली़
याप्रकरणी खडक पोलिसांनी आकिबदस्तगीर शेख (रा़ कासेवाडी, भवानी पेठ) याला अटक केली आहे़ याप्रकरणी राहुल चंद्रकांत सकट (वय २४, रा़ कासेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़
फिर्यादी व त्यांचा मित्र कासेवाडीतील आदर्श मित्र मंडळ येथे रात्री साडेअकरा वाजता गप्पा मारत होते़ यावेळी शेख तेथे आला़ त्याने चष्टामस्करीत राहुलची गचंडी पकडून हाताने मारहाण केली़ राहुल याच्या डाव्या हाताच्या करंगळीचा जोरात चावा घेतला़ हा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या करंगळीचा नखासहीत शेंडा बोटापासून वेगळा झाला़ पोलीस उपनिरीक्षक कोळी अधिक तपास करीत आहेत़