चार वेळा रद्द झालेली संयुक्त पूर्वपरीक्षा आज होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:15 IST2021-09-04T04:15:15+5:302021-09-04T04:15:15+5:30

पुणे : तब्बल चार वेळा रद्द झालेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संवर्गातील संयुक्त पूर्वपरीक्षा अखेर आज ...

The joint pre-examination, which has been canceled four times, will be held today | चार वेळा रद्द झालेली संयुक्त पूर्वपरीक्षा आज होणार

चार वेळा रद्द झालेली संयुक्त पूर्वपरीक्षा आज होणार

पुणे : तब्बल चार वेळा रद्द झालेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संवर्गातील संयुक्त पूर्वपरीक्षा अखेर आज (शनिवार, दि. ४) होणार आहे.

सन २०२० मध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली हाेती. कोराेना महामारी, मराठा आरक्षण निकाल तसेच इतर काही कारणामुळे गेल्या दीड वर्षात ही संयुक्त पूर्वपरीक्षा त्यानंतर ३ मे २०२०, ११ ऑक्टोबर २०२०, २२ नोव्हेंबर २०२० आणि ११ एप्रिल २०२१ अशी तब्बल चार वेळा ही परीक्षा रद्द झाली आहे. पाचव्या वेळी ही परीक्षा होत आहे. एकूण ८०६ जागांसाठी ही परीक्षा होत आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आयोगाने दोन आठवडे आधीच संकेस्थळावर उपलब्ध केलेले आहे. या प्रवेशपत्राची एक प्रत विद्यार्थ्यांनी सोबत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही.

Web Title: The joint pre-examination, which has been canceled four times, will be held today