पुणे - प्रतिनिधीशहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळाची पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिंहडी यंदा डिजे मुक्त साजरी केली जाणार आहे. डिजे न लावता पारंपारिक ढोल ताशांसह प्रभात बॅन्ड, मुंबईतील नामांकित वरळी बिट्स यांच्या वाद्य संगीताच्या तालावर यंदाची दहिहंडी फोडली जाणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली. छत्रपती शिवाजी रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल चौकात गतवर्षीपासून पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहिहंडी उत्सव सुरू करण्यात आला आहे. प्रामुख्याने चौक चौकात होणार्या दहिहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी बालन यांनी या संयुक्त दहिहंडीसाठी पुढाकार घेतला होता. त्याला प्रतिसाद देत पहिल्याच वर्षी 35 मंडळांनी एकत्र संयुक्त दहिहंडी साजरी केली होती. आता पुन्हा सलग दुसर्यावर्षी ही संयुक्त दहिहंडी साजरी केली जाणार आहे. मात्र, यावर्षी पुनीत बालन यांनी डिजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या दहिहंडीत उत्सवातही डिजे न लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा पारंपारिक वाद्यांच्या गजरात दहिहंडी फोडली जाणार आहे.
त्यानुसार दहिहंडीला सुरवातीला युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा यांचे ढोल वादन होणार आहे, त्यानंतर प्रभात बॅन्डचे वादन होणार आहे. त्यानंतर मुंबईतील प्रसिध्द बँजो वरळी बिट्स यांच्या संगीत तालावर दहिहंडी फोडली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उज्जन येथील पारंपारिक शिव महाकाल या कार्यक्रम यावेळी होणार असल्याची माहिती पुनीत बालन यांनी दिली.
संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी मंडळे
- श्रीमंत पेशवे गणपती मंदिर- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट- श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट- श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट- पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती- श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड)- उदय तरुण मंडळ (एफसी रोड)- नागनाथ पार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट- मंजुबा तरुण मंडळ (पीएमसी)- फणी आळी तालीम ट्रस्ट- प्रकाश मित्र मंडळ- भरत मित्र मंडळ- त्वष्टा कासार समाज संस्था- आझाद हिंद मंडळ (जे.एम रोड)- श्री शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव- श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठाण- जनता जर्नादन मंडळ प्रतिष्ठान- जनता जनार्दन मंडळ- क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडळ- गणेश मित्र मंडळ (अलका चौक)- भोईराज मित्र मंडळ- शिवतेज ग्रुप- नटराज ग्रुप