नौदलात नोकरीचे आमिष
By Admin | Updated: January 24, 2017 02:29 IST2017-01-24T02:29:10+5:302017-01-24T02:29:10+5:30
भारतीय नौदलामध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने आठ जणांना दहा लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. आरोपींनी तरुणांना

नौदलात नोकरीचे आमिष
पुणे : भारतीय नौदलामध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने आठ जणांना दहा लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. आरोपींनी तरुणांना बनावट नियुक्तिपत्रही दिले होते. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन संजय जाधव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उषा जगन्नाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा जाधव या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात. आरोपी सचिनची धनकवडी भागामध्ये सुरभी करिअर सोल्युशन्स नावाची फर्म आहे. त्याने सैन्य दलामध्ये शंभर टक्के भरती अशी जाहिरात केली होती. त्याने वाटलेली पत्रके वाचून नोकरीची आवश्यकता असलेल्या उषा यांच्यासह अन्य काही जणांनी त्याची भेट घेतली. त्याने सर्वांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते.
त्यासाठी पैशांची मागणी केली. नियुक्तिपत्र दिल्यानंतर पैसे द्या, असे त्याने सांगितल्यामुळे सर्वांचा विश्वास बसला. त्याने १० दिवसांपूर्वी जवळपास ८ जणांना भारतीय नौदलाच्या नोकरीचे बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना २० जानेवारीला कोची येथे हजर राहायचे सांगत सर्वांना १८ तारखेला पुण्यातून निघा, असे बजावले. त्याने सर्वांकडून एकूण १० लाख रुपये उकळले.