शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

क्षणभर विश्रांतीचा पुण्यातील जे. एम.रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:48 IST

शहराच्या गाेंगाटात, धकाधकीच्या अायुष्यात क्षणभर विश्रांती हवी असेल, तर पुण्यातील जंगली महाराज रस्त्याला तुम्ही भेट द्यायला हवी. येथील विशिष्ट रचना पुणेकरांच्या पसंतीस पडत अाहे.

ठळक मुद्देकाही काळ शांत बसण्यासाठीचे ठिकाण म्हणून जे.एम. रस्ता येताेय समाेरखास करुन तरुणांना हॅंग अाऊटसाठी एक हक्काची जागा तयार झाली अाहे.

पुणे : सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण क्षणभर विश्रांतीच्या शोधात असतो. शहरातील गोंगाटामध्ये अर्धातास का होईना शांत बसता यावे अशी एखादी जागा शहरात असावी असे प्रत्येकाला वाटत असते. नागरिकांची हिच इच्छा पुणे महानगरपालिकेने पुर्ण केली आहे. पालिकेने पुण्यातील जंगली महाराज रस्त्याचे (जे.एम. रस्ता) वेगळ्या पद्धतीने सुशोभिकरण केले असून या ठिकाणी नागरिकांसाठी बसण्यास विशिष्ठ व्यवस्था करण्यात आल्याने, नागरिकांची याला मोठी पसंती मिळत आहे.     पुण्यातील शांतपणा, झाडांनी अच्छादलेले रस्ते सर्वांनाचा आकर्षित करत असतात. मात्र वाढत्या शहरीकरणामध्ये ही शांतता हरवत चालली होती. जे.एम रस्त्यावर करण्यात आलेल्या नव्या रचनेमुळे गोंगाटामध्येही शांतता आता नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. खास करुन तरुणाईमध्ये या जागेचे खास आकर्षण असून मित्र-मैत्रीणींसोबत गप्पा मारण्यासाठी हक्काचे ठिकाण आता तयार झाले आहे. या ठिकाणी बसल्यावर आपण नक्की भारतातच आहोत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. डबा खायचा असेल किंवा मग समोरा समोर बसून चर्चा करायची असेल, जे.एम रस्ता आता नवीन हँगिग आऊट साठीचा स्पॉट म्हणून समोर येत आहे. 

     शेजारीच बालगंधर्व रंगमंदिर आणि संभाजी उद्यान आहे. त्यामुळे नाटक बघायला आला असाल आणि कोणाची वाट पाहताय तर तुम्हाला जागेची शोधा शोध करण्याची गरज नाही. याठिकाणचा फुटपाथही मोठा असल्याने पादचाऱ्यांचाही तुम्हाला त्रास होत नाही. तुम्ही शांतपणे तुमचं काम करु शकता. अनेक स्मार्ट पुणेकर तर आपल्या लॅपटॉपवरही या ठिकाणी काम करत तासनतास बसतात. इथे बसून पुस्तके वाचणाऱ्यांची आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. या सारखीच रचना शहराच्या इतर भागातही करण्यात येत आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांनाही हा अनुभव आता घेता येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरStudentविद्यार्थी