शिरूरमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:51+5:302021-01-14T04:09:51+5:30
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेब जयंती उत्सव समिती शिरूर व सकल मराठा समाज शिरूर यांच्या वतीने ...

शिरूरमध्ये जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेब जयंती उत्सव समिती शिरूर व सकल मराठा समाज शिरूर यांच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ मॉं साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी आमदार बाबूराव पाचर्णे, प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम, ऊर्जा दूधचे प्रकाश कुतवळ, माजी नगरसेवक सुकुमार बोरा, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, भाजपाचे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पाचंगे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, नगरसेवक विठ्ठल पवार, नितीन पाचर्णे,
विनोद भालेराव, संदीप गायकवाड, नगरसेविका रोहीणी बनकर, शिक्षण मंडळ माजी सभापती संतोष शितोळे, निलेश खाबिया, ॲड किरण आंबेकर, सेवानिवृत्त कॅप्टन वसंत कटके, डॉ सुभाष गवारी, डॉ नारायण सरोदे, डॉ. भाउसाहेब पाचुंदकर, रामभाउ शेटे, महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी सरपंच अरुण घावटे, विठ्ठल घावटे, वर्षा काळे, वैशाली गायकवाड, सुषमा घोरपडे, सागर नरवडे, उमेश शेळके,
योगेश महाजन, रमेश दसगुडे, निलेश नवले, रामभाउ इंगळे उपस्थित होते.
यावेळी दुधाच्या टॅंकरवरर चालक असलेले आंधळगाव येथील कै. रामभाऊ विष्णू कुसेकर यांना मरणोत्तर राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या पत्नी मंगल कुसेकर यानी हा पुरस्कार स्वीकारला .
यावेळी सुकुमार बोरा, नगरसेवक भालेराव, नामदेवराव घावटे आदीची भाषणे झाली. यावेळी प्रास्ताविक प्रा. सतिष धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व किरण घावटे यानी केले. महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे यानी आभार मानले .