खासदारांची समिती घेणार झाडाझडती

By Admin | Updated: February 10, 2016 03:19 IST2016-02-10T03:19:24+5:302016-02-10T03:19:24+5:30

आमदारांच्या पंचायतराज समितीने केलेल्या झाडाझडतीनंतर आता लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांची अत्यंत महत्त्वाची असलेली संसदीय स्थायी समिती जिल्ह्याला भेट देत आहे.

Jharkhand will organize a committee of MPs | खासदारांची समिती घेणार झाडाझडती

खासदारांची समिती घेणार झाडाझडती

पुणे : आमदारांच्या पंचायतराज समितीने केलेल्या झाडाझडतीनंतर आता लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांची अत्यंत महत्त्वाची असलेली संसदीय स्थायी समिती जिल्ह्याला भेट देत आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पाहणीसाठी बारामती तालुक्याची निवड केली आहे.
१0 वर्षांनंतर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पंचायतराज कमिटी आली होती. या कमिटीने जिल्हा परिषदेला मोठा दणका दिला होता. हलगर्जीपणा,अनियमितता आणि सरकारी निधीचा अपव्यय, नियमबाह्य काम या प्रकरणी ठपका ठेवून सुमारे १७ जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे निलंबन, ४0 जणांवर फौजदारी, १३३ आणि १३७ कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली होती. त्यांनी सन २0१0-११ या वर्षांतील लेखापरीक्षण अहवालावर सुनावणी घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती.
त्यानंतर आता ३१ खासदारांचा सहभाग असलेली संसदीय समिती १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुण्यात येत असून, १५ फेबु्रवारीला ते बारामतीला भेट देणार आहेत. ही समिती केंद्रपुरस्कृत योजनांचा लेखाजोखा तपासणार आहे. आता ही ३१ खासदाराची संसदीय स्थायी समितीही फक्त बारामतीलाच भेट देणार आहे.
यात लोकसभेचे खासदार शिशिर अधिकारी, कीर्ती आझाद, रेणुका बुट्टा, हरिश्चंद्र चव्हाण, बिरेनसिंह एंग्टी, विजय कुमार हन्सदक, अजय मिश्रा (टेनी), मनशंकर निनामा, मोसम नूर, डॉ. महेंद्रनाथ पांडे, प्रल्हादसिंह पटेल, डॉ. रमेश पोखरीयाल, गोकाराजू गंगा राजू, डॉ. अंबुमणी रामडॉस, जुगलकिशोर शर्मा, डॉ. यशवंत सिंह, नराामली शिवप्रसाद, बालका सुमन, लाडूकिशोर स्वैन, अ‍ॅड. चिंतामण वांगा. तर राज्यसभेचे खासदार मंकद अली, गुलाम बाल्यावी, डी. बंडोपाध्याय, राम नरेन दुदी, रणविजयसिंग जुदेव, अश्विनी कुमार, महेंद्रसिंह म्हारा, डॉ. विजयलक्ष्मी साधो, ए.के. सेल्वराज, कनकलता सिंह आदी ३१ जणांचा समावेश आहे.
बारामती कृषी विज्ञान केंद्राबरोबर येथील चार गावांना भेटी देऊन केंद्रपुरस्कृत ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा लेखाजोखा ते घेणार आहेत. आता ही समिती पंचायतराज समितीप्रमाणे काय कारवाई करणार, अशी दबक्या आवाजात चर्चा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांत सुरू आहे.

सहा महिने फक्त समित्या आणि समित्या
सप्टेंबर महिन्यात पंचायतराज कमिटी आली. ती येत असल्याने अगोदर महिना-दोन महिने तयारीत व येऊन गेल्यानंतर महिना साक्ष देण्यात गेला. त्यानंतर १ फेबु्रवारीला महिलांची हक्क कल्याण समिती येऊन गेली. आता संसदीय स्थायी समिती येत असून, त्यानंतर २३ फेबु्रवारी रोजी विधिमंडळाची अनुसूचित जमाती समिती भेट देणार आहे.

Web Title: Jharkhand will organize a committee of MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.