निर्बंध काळातही रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांची दागिने बुकिंग योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:10 IST2021-04-26T04:10:50+5:302021-04-26T04:10:50+5:30

याआधी गुढी पाडव्याला सुरू करण्यात आलेली ऑनलाईन सोने बुकिंगची योजना सुरू आहे. कोविडच्या निर्बंध काळातही दागिने खरेदीसाठी एक विशेष ...

Jewelry booking scheme of Ratanlal C Bafna Jewelers even during restricted period | निर्बंध काळातही रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांची दागिने बुकिंग योजना

निर्बंध काळातही रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांची दागिने बुकिंग योजना

याआधी गुढी पाडव्याला सुरू करण्यात आलेली ऑनलाईन सोने बुकिंगची योजना सुरू आहे. कोविडच्या निर्बंध काळातही दागिने खरेदीसाठी एक विशेष ऑफर ग्राहकांना देऊ केली आहे. सदर ऑफरमध्येही ग्राहक पसंतीचे दागिने आजच्या दराने ७५ टक्के रक्कम जमा करून ऑनलाईन बुक करू शकतात. डिलिव्हरी घेतेवेळी सोन्याचे दर घसरल्यास ग्राहक कमी झालेल्या दराने आणि सोने दर वाढल्यास बुकिंग केलेल्या दराने आपले सुवर्ण अलंकार खरेदी करू शकतात. सदर योजना २२ कॅरेट हाॅलमार्क दागिन्यांसाठी असून दागिन्यांची डिलिव्हरी ग्राहकांनी ३१ मेपर्यंत घेणे बंधनकारक आहे. या योजनेसोबतच २२ कॅरेट दागिन्यांच्या घडणावळीवर १५ टक्के इतकी सूट खरेदीदारांना मिळणार आहे. सदरची योजना २२ एप्रिलपासून सुरू झाली असून बुकिंगसाठी रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा. सणासुदीचे दिवस आणि लग्नकार्यासाठी अलंकारांच्या खरेदीच्या लगबगीत दुहेरी लाभ देणार्या या ऑफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.

Web Title: Jewelry booking scheme of Ratanlal C Bafna Jewelers even during restricted period