जेजुरी पोलिसांनी अट्टल घरफोड्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST2021-07-12T04:08:58+5:302021-07-12T04:08:58+5:30

याबाबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हा मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत दिवसा ...

Jejuri police caught Attal burglary | जेजुरी पोलिसांनी अट्टल घरफोड्यास पकडले

जेजुरी पोलिसांनी अट्टल घरफोड्यास पकडले

याबाबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हा मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत दिवसा साईबाबा, खंडोबाची गाणी, भजने गात असे आणि रात्रीच्या वेळी घरफोड्या करीत असे. ठाणे पोलिसांकडे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हा सध्या जेजुरीत वास्तव्यास असल्याचा सुगावा ठाणे पोलिसांना लागला होता. त्यानुसार ठाणे पोलिसांनी जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना याबाबतची माहिती दिली होती.

काल रात्री जेजुरी कडेपठार मंदिरात गणपूजा उत्सव असल्याने जेजुरी पोलीस कर्मचारी कडेपठार परिसरात बंदोबस्तावर होते. सदर आरोपी हा कडेपठार रोडवरील एका घरामध्ये त्याच्या साथीदारांसमवेत आलेला असल्याची माहिती पोलीस हवालदार मोकाशी यांना मिळाली. जेजुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. जेजुरी परिसरात त्याने काही गुन्हे केले आहेत का याचाही तपास केला. मात्र या परिसरात त्याने गुन्हा केलेला नसल्याने आज आरोपीस ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Jejuri police caught Attal burglary