कोरेगावमूळला जीप पेटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST2021-01-09T04:08:46+5:302021-01-09T04:08:46+5:30

मंगेश सुरेश शितोळे (वय ३५, रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. ...

The jeep caught fire at Koregaon | कोरेगावमूळला जीप पेटवली

कोरेगावमूळला जीप पेटवली

मंगेश सुरेश शितोळे (वय ३५, रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या मालकीची जीप (एम.एच.१२ के.ई. ८६४४) आगीत पूर्ण भस्मसात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव मूळ, इनामदारवस्ती येथे गट क्र. २६१ येथील नर्सरी क्षेत्रात ही जीप गुरुवारी ७ रोजी रात्री उभी केली होती. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी निवडणुकीच्या प्रचाराचा राग मनात धरून गाडीवर पेट्रोल ओतून जीपला आग लावून पेटवून दिली आहे. या आगीत चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहेत.

Web Title: The jeep caught fire at Koregaon