हौशी मराठी राज्य नाट्यलेखन स्पर्धेत जयंत पवारांचे नाटक प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:23+5:302021-06-22T04:09:23+5:30
आणि तृतीय पारितोषिक शिवाजी करडे (नाटक-भावकी) यांना जाहीर करण्यात आले. नाट्य स्पर्धेत प्रत्येक केंद्रातून तीन संहितांची निवड केली जाते. ...

हौशी मराठी राज्य नाट्यलेखन स्पर्धेत जयंत पवारांचे नाटक प्रथम
आणि तृतीय पारितोषिक शिवाजी करडे (नाटक-भावकी) यांना जाहीर करण्यात आले.
नाट्य स्पर्धेत प्रत्येक केंद्रातून तीन संहितांची निवड केली जाते. संहिता नवीन नाट्यलेखन केलेल्या असल्यास या स्पर्धेसाठी विचारात घेऊन प्रत्येक केंद्रातून ३ संहितांची निवड परीक्षक करतात. राज्यातील २० केंद्रांतून आलेल्या संहितांचे परीक्षण करण्यासाठी ३ परीक्षक नेमले होते. या स्पर्धेत तृतीय क्रमांक आलेले नाटक "भावकी" हे पुणे केंद्रावर सादर झाले होते. चिंतामणी फाउंडेशन आणि निळू फुले कला अकादमीने या नाटकाची निर्मिती केली होती. नाटकाचे लेखन शिवाजी करडे यांनी केले होते.
राज्य नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात लेखन स्पर्धेच्याही पारितोषकांचे वितरण केले जाईल..
कोरोनामुळे पारितोषक वितरण समारंभासाठी उशीर होत असल्याने हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धा या स्पर्धेच्या विजेत्यांची बक्षिसाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे..
पारितोषिके समारंभात प्रदान करण्यात येतील, असे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे.