शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जय हो! 'प्राण' घेऊन पुण्यात पोहचली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' ; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 00:52 IST

पुणे विभागात दाखल झालेली ही पहिलीच तर महाराष्ट्रसाठी ही पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस ठरली. 

ठळक मुद्देचार टँकरमधून 55 मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक 

प्रसाद कानडे- 

पुणे: अवघ्या 37 तासांत 1725 किमीचे अंतर पार करीत अंगुल हुन निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास लोणीत दाखल झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर दिला असल्याने केवळ क्रु (चालक व गार्ड) बदलण्यासाठी ही गाडी केवळ 5 मिनिटं थांबत.अन लगेच पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत. रो रो सेवेद्वारे चार टॅन्कर आणण्यात आले. यातून 55 मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक झाली. पुणे विभागात दाखल झालेली ही पहिलीच तर महाराष्ट्रसाठी ही पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस ठरली. 

अंगुल (ओरिसा ) येथून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता चार टॅन्कर नागपूर च्या दिशेने रवाना झाले. मंगळवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटंनी नागपूर स्थानकवर गाडी दाखल झाली. क्रु बदलुन तात्काळ ही गाडी लोणी साठी 6 वाजून 30 मिनीटांनी मार्गस्थ झाली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर असल्याने मार्गात गाडीला सर्वच सिग्नलवर ग्रीन सिग्नल देण्यात आला.त्यामुळे गाडीची गती जरी  कमी असली तरीही ग्रीन कॉरिडॉर मुळे वेळेत मोठया प्रमाणात बचत केली  गेली. 

शंटिंग लाईन जोडले रॅम्प : लोणी स्थानकावरील इंजीन च्या शंटिंग लाईन ला जोडूनच नव्याने रॅम्प तयार करण्यात आले. याच लाईन वर ऑक्सिजन एक्सप्रेस आणण्यात आली.यावेळी येथे लाईट ची सोय देखील करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनासह, जिल्हा प्रशासनचे अधिकारी उपस्थित होते. हवा भरण्यासाठी एक तास  टँकरची वाहतूक करताना सुरक्षेच्या कारणास्तव टॅन्कर च्या चाकातील हवा काढून टाकली जाते.गाडी रॅम्प वर उतरून घेताना पुन्हा हवा भरावी लागते.हवा भरण्यासाठी चार कम्प्रेसर ची सोय करण्यात आली. शिवाय कम्प्रेसर रुळा जवळून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले तर त्या साठी दोन रिक्षा देखील आणून ठेवण्यात आल्या होत्या. एका टँकर मध्ये हवा भरण्यासाठी किमान एक तास लागला.

टॅग्स :PuneपुणेOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या