जावयाने सासूला पेटवले; २0 टक्के भाजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:10 IST2017-08-03T03:10:43+5:302017-08-03T03:10:45+5:30

आपल्या पत्नीचा घात करण्याच्या उद्देशानेच मेव्हण्याने तिला दुचाकीवरून खाली पाडल्याचा समज करून जावयाने सासूच्याच घरातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन जात त्यांच्या अंगावर पेट्रोल

Jawya burnt her mother-in-law; 20 percent burns | जावयाने सासूला पेटवले; २0 टक्के भाजल्या

जावयाने सासूला पेटवले; २0 टक्के भाजल्या

बिबवेवाडी : आपल्या पत्नीचा घात करण्याच्या उद्देशानेच मेव्हण्याने तिला दुचाकीवरून खाली पाडल्याचा समज करून जावयाने सासूच्याच घरातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन जात त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात त्या २0 टक्के भाजल्या आहेत. याप्रकरणी जावयाविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ असलम मुजावर ( रा. आदर्श कॉलनी, डांगे चौक, वाकड रस्ता) आणि दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुलताना महंमद शेख (वय ३८, रा. बिबवेवाडी) यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ मुजावर हा फिर्यादी यांचा जावई आहे. फिर्यादी यांच्या मुलाने त्याची बहीण म्हणजेच मुजावर यांच्या पत्नीला दुचाकीवरून पाणीपुरी खाण्यासाठी स्वारगेट येथे घेऊन जात असताना ती गाडीवरून खाली पडून जखमी
झाली.

Web Title: Jawya burnt her mother-in-law; 20 percent burns