जपानी भाषा अद्भुत

By Admin | Updated: January 24, 2017 02:26 IST2017-01-24T02:26:19+5:302017-01-24T02:26:19+5:30

जगातील सर्व भाषांमध्ये जपानी भाषा ही अद्भुत आणि सुंदर भाषा आहे, कारण ती चित्रलिपीतून साकार होते, असे प्रतिपादन जपान

Japanese language wonderful | जपानी भाषा अद्भुत

जपानी भाषा अद्भुत

पुणे : जगातील सर्व भाषांमध्ये जपानी भाषा ही अद्भुत आणि सुंदर भाषा आहे, कारण ती चित्रलिपीतून साकार होते, असे प्रतिपादन जपान फाउंडेशनच्या पश्चिम विभागाचे सल्लागार तात्सुया हिरागा यांनी केले.
अहिल्यादेवी प्रशालेत चालणाऱ्या जपान अभ्यास प्रकल्पांतर्गत प्रशालेतील विद्यार्थिनींनी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाला भेट दिली. त्यात तात्सुया हिरागा सहभागी झाले. या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी जपानी भाषेतील गाणी म्हणून दाखवली तसेच ओरेगामी कलेच्या आविष्कारातून कागदाचे सुंदर पक्षीही करून दाखविले. बागेची माहिती चंद्रशेखर राठोड यांनी
दिली. प्रकल्पाचे संयोजन स्मिता करंदीकर यांनी केले.
उद्यानभेटीसाठी नैतिका राठोड, शुभदा राजगुरू यांचे सहकार्य मिळाले. मुख्याध्यापिका सुलभा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Japanese language wonderful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.