शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काँग्रेसची जनसंघर्ष रथयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 02:47 IST

अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन : जनतेच्या हितासाठी यात्रा

पुणे : केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षांच्या अपयशी कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनतेच्या हितासाठी जनसंघर्ष यात्रेस सुरुवात झाली आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते जनसंघर्ष रथाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुणे शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, आमदार अमर राजूरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड, अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे, रोहित टिळक, नीता रजपूत, नगरसेवक आबा बागुल, रवींद्र घेणेकर, मनीष आनंद, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवार (३१) पासून कोल्हापूर येथून सुरू होणार आहे. या यात्रेस लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. याबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी होणार आहेत.६ सप्टेंबर रोजी जनसंघर्ष यात्रेचे रथ पुणे शहरातील पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कँन्टॉन्मेंट व हडपसर या मतदार संघात जाणार आहे. ७ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे जाहीर सभा होणार असून ८ सप्टेंबर रोजी या यात्रेचा समारोप सभा पुण्यात होणार आहे.नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड सनातन संस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात सरकार कठोर कारवाई का करत नाही, असा सवालही त्यांनी केला. भिडे यांना कुठल्याही चौकशीविना मुख्यमंत्री क्लीन चिट देतात हे कशाचं लक्षण आहे, या उलट सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणाऱ्या विचारवंतांची मात्र धरपकड केली जातेय. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणे