शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; भारतीय संघाचा T20I मधील घरच्या मैदानातील सर्वात मोठा पराभव
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
5
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
6
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
7
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
8
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
9
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
10
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
11
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
12
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
13
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
14
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
15
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
16
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
17
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
18
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
19
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
20
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

३१ डिसेंबरला जंगली महाराज, फर्ग्युसन, महात्मा गांधी रस्ता ‘नो व्हेईकल झोन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 10:43 IST

पुणे : ३१ डिसेंबरला वर्षअखेर व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी करतात. वाहनांवरून वेगाने जाणे, हुल्लडबाजी ...

पुणे : ३१ डिसेंबरला वर्षअखेर व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी करतात. वाहनांवरून वेगाने जाणे, हुल्लडबाजी करण्याचे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रस्त्यावर ३१ डिसेंबरला सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात येणार आहे.

गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मुख्य गेट, झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकी) दरम्यान वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्यांवर वळविण्यात येणार आहे.

वाहतुकीत करण्यात आलेले बदल

  • पुणे कॅम्प भागात दि. ३१ डिसेंबरला सायंकाळी सात वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत करण्यात येणारे वाहतुकीचे डायव्हर्शन
  • वाय जंक्शनवरून एमजी रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
  • ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
  • व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
  • इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून यावरील वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
  • सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबूत स्ट्रीटरोडमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.

 

नववर्ष दिनी शिवाजी रोडवरील वाहतुकीत बदल

नववर्षानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री उशिरा गर्दी संपेपर्यंत शिवाजी रोडवर चार चाकी वाहने व सर्व प्रकारच्या बसगाड्यांना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे टिळक रोडचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड31st December party31 डिसेंबर पार्टीfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालय