शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दफनभूमीचे आरक्षण बदल्याने संतप्त नागरिकांनी आणला थेट ‘जनाजा’ च महापालिकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 12:11 IST

मागील चार वर्षांपासून याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या मृत्युनंतर दफन विधी होत होेते. परंतू, नुकतेच याठिकाणी पीएमपीएमएलसाठी आरक्षित फलक लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअखेर खराडीच्या जागेत प्रशासनाकडून मृतदेह दफन करण्याची परवानगीअ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कायदेशीर कारवाईचे फलक लावण्यात येणार

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या खराडी येथील अ‍ॅॅमेनिटी स्पेसच्या जागेचे आरक्षण प्रशासनाने परस्पर बदल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी (दि.७) रोजी चक्क जनाजा महापालिकेत आणून आंदोलन केले. या आंदोलनामुळे भानावर आलेल्या प्रशासनाने अखेर खराडीच्या आरक्षित जागेत मृतदेह दफन करण्याची परवानगी देली. तसेच या जागे संदर्भांत आयुक्तांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि.८) रोजी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन सभागृहात देण्यात आले. खराडी येथील एका अ‍ॅॅमेनिटी स्पेसच्या जागेवर यापूर्वी महापालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दफनभूमीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार मागील चार वर्षांपासून याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या मृत्युनंतर दफन विधी होत होेते. परंतू, नुकतेच याठिकाणी पीएमपीएमएलसाठी आरक्षित फलक लावण्यात आले आहेत. यामुळे खराडीतील एका मुस्लिम बांधवाचे निधन झाल्यानंतर या जागेवर दफनविधी करण्यास प्रशासनाने नकार दिला. यामुळे माजी आमदार बापू पठारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानीक नगरसेवक आणि नागरिकांनी मृतदेह सह जनाजा महापालिकेमध्ये आणला. यामुळे प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली. आंदोलकांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केल्यानंतर अखेर वरिष्ठ अधिका-यांनी खराडीतील त्याच अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेवर मृतदेहाचा दफन विधी करण्यास परवानगी दिली. दरम्यान या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या मुख्यसभेत देखील उमडले. यामध्ये स्थानीक नगरसेवक अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, सुमन पठारे यांनी आरक्षण परस्पर बदल्याने जोरदार टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना उपायुक्त अनिल मुळे यांनी सांगितले की, अ‍ॅमेनिटी समितीने ही जागा दफनभूमीसाठी आरक्षित केली होती. त्यानंतर याच समितीने हीच जागा पीएमपीएमएलला हस्तांतरीत केली आहे. परंतु आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तातडीने बैठक घेऊन अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कायदेशीर कारवाईचे फलक लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरMuslimमुस्लीमPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका