शिवराज्याभिषेकानिमित्त जलकुंभ यात्रा
By Admin | Updated: June 9, 2014 05:11 IST2014-06-09T05:11:15+5:302014-06-09T05:11:15+5:30
संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो.

शिवराज्याभिषेकानिमित्त जलकुंभ यात्रा
मार्गासनी : संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिनविशेष सोहळा म्हणून रायगडावर साजरा केला जातो. या सोहळ्यास राज्यभरातून शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा, अशी मागणी शिवप्रेमी वारंवार करीत आहेत. या अनोख्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेल्हा व भोर तालुक्यातील शिवाजी महाराजांचे हजारो मावळे जातात. ६ जून १६७४ रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या गुंजन मावळ परिसरातील गडकोट व येथील नद्यांचे पाणी शिवराज्याभिषेकासाठी आणण्यात आले होते. याची स्फुर्ती घेऊन ही परंपरा तालुक्यातील मावळा जवान संघटनेने सुरू ठेवली असून, राजगड परिसरातून संघटनेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर व पुरंदर या किल्ल्यांवरील व गुंजवणी, कानंदी, वेळवंडी, भामा-भीमा, इंद्रायणी, मुठा या सप्त नद्यांचे जलकुंभ यात्रा किल्ले तोरणा, राजगड ते रायगडपर्यंत केली जाते. या जलकुंभ यात्रेत मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सणस व ज्येष्ठ इतिहास तज्ञ दत्ताजी नलावडे, हनुमंत दिघे, मनोज ओव्हाळ, राहुल भोसले, दत्ता मळेकर, दिगंबर धुमाळ तसेच शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश म्हेत्रे, विनायक कालेकर आदींसह लाखो शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.
पाच जून रोजी राजगडावरुन निघालेल्या जलकुंभ यात्रेचे स्वागत भोर येथील शिवाजी चौकात करण्यात आले. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीमहाराज यांच्यासमवेत मावळा संघटनेच्या मावळ्यांनी रायगड किल्ला पायी पन्नास मिनिटांत सर
केला. (वार्ताहर)