शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील अतिशोषित गावात ‘जलधरा निर्धारण’; लोकसहभागातून करणार व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:13 IST

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधून जिल्ह्यातील अतिशोषित गावांमधील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात येत असून भूजल पुनर्भरणाची कामे वाढविण्यासोबतच उपलब्ध पाण्याचे लोकसभागातून व्यवस्थापन करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देजागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यामधून जानेवारी २०१५ पासून जलस्वराज्य-२ प्रकल्पाला सुरुवात२० ते २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच काढली जाणार कामाची निविदा

पुणे : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधून जिल्ह्यातील अतिशोषित गावांमधील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात येत असून पुरंदर, शिरुर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांमधील २२ गावांमध्ये ४ जलधरांचे निर्धारण (अ‍ॅक्विफर मॅपिंग) करण्यात आले आहे. भूजल पुनर्भरणाची कामे वाढविण्यासोबतच उपलब्ध पाण्याचे लोकसभागातून व्यवस्थापन करण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यामधून जानेवारी २०१५ पासून जलस्वराज्य-२ प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. भूजलाचे अतिशोषण झालेल्या पुरंदर तालुक्यातील ९, शिरूरमधील ७, खेडमधील ५ आणि आंबेगाव तालुक्यातील १ अशा २२ गावांमध्ये जलधर निर्धारण आणि लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये भूजल व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लोकसहभागातून आराखडा तयार करणे, पाण्याचे आॅडिट, कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना राबविणे, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण, लोकसहभागातून भूजल वापर, त्यानुसार पीक पद्धती, सुक्ष्म जलसिंचनावर भर देऊन, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा आराखडा तयार असून, भूजल पुनर्भरणासाठी रिचार्ज शाप्ट घेणे, चर खोदणे, डोंगरालगत गोलाकार चर खोदणे आदी कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे वरिष्ठ भू वैज्ञानिक प्रमोद रेड्डी यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे २२ गावातील लोकांना पिण्याचे पाणी कायमस्वरुपी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. त्यासाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच कामाची निविदा काढली जाणार आहे. 

टॅग्स :Waterपाणीpurandarपुरंदरambegaonआंबेगाव