शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाने राष्ट्रीय स्तरावर जलकार्यक्रम हाती घ्यावा : किरण बेदी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 19:56 IST

आज देशासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे...

ठळक मुद्दे-लोकमतच्या सहयोगाने राष्ट्रीय जैन महिला कॉन्फरन्सएखादा वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम दत्तक घ्यावा

पुणे : जैन समाज  विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करीत आहे, ही निश्चितचं वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. मात्र आपल्या जीवनाचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी देखील झाला पाहिजे. यासाठी एखादा राष्ट्रीय कार्यक्रम समाजाने दत्तक घेतला पाहिजे. आज देशासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. पाणी वाचवा ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे  समाजाने राष्ट्रीय स्तरावर जलकार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन पाँडेचरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी केले.श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली राष्ट्रीय महिला शाखा आणि लोकमत च्या सहयोगाने आयोजित राष्ट्रीय महिला अधिवेशनामध्ये '' जितो जिंदगी की हर जंग '' याविषयावर त्या बोलत होत्या. आचार्य शिवमुनीजी, प्रवर्तक प्रकाशमुनीजी, प्रमुख मंत्री शिरीषमुनीजी यांच्या पवित्र सान्निध्यात व युवाचार्य महेंद्रॠषीजी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पूना चे अध्यक्ष विजयकांत कोठारी, लखीचंद खिवंसरा, बाळासाहेब धोका, माणिक दुगड, रमणलाल लुंकड, विजय भंडारी,पारस मोदी, विलास राठोड, आदेश खिवंसरा, सुदर्शन बाफना, राजेश सांकला, श्री आॅल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षा विमल बाफना, रमेशलाल गुगळे, संजय सांकला यांच्या उपस्थितीत सीडीचे प्रकाशन करण्यात आले. 

किरण बेदी म्हणाल्या, जैन समाज विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करीत आहे. मात्र आपल्या ताकदीचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करावा. यासाठी एखादा वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम दत्तक घ्यावा.अधिवेशनाच्या निमित्ताने सुंदर अधिवेशन आणि सुंदर नाव ही स्पर्धा झाली. यात दोनशे महिला सहभागी झाल्या. नवी सांगवी येथील सीमा कटारिया ' शिव शरणा वीर चंदना' यांनी सूचित केलेले नाव अधिवेशनाला देण्यात आले. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी आणि विमल बाफना, विजय कांत कोठारी आदींच्या उपस्थितीत उदघाटन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी बाफना यांनी केले.

..................पुरूषांच्या तुलनेत महिला कुठेही कमी नाहीत. महिलांना स्वातंत्र्य असावे असे म्हणतात. पण महिलांना स्वातंत्र्य दिले गेले आहे, फक्त ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला- विमल बाफना, राष्ट्रीय अध्यक्षा महिला शाखा,  श्री आॅल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीKiran Bediकिरण बेदी