शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘जयहिंद’च्या स्वागताने पोलिसांचा त्रास कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 03:36 IST

१०० क्रमांकावरील कॉलमध्ये घट; इंटरअ‍ॅक्टिव्ह रिस्पॉन्स सिस्टीमचा परिणाम

पुणे : ‘जयहिंद.. पुणे शहर पोलीसांतर्फे स्वागत...’ अशी सुरुवात पोलिसांच्या आणीबाणीसाठी असलेल्या १०० क्रमांकावर सुरू झाल्याने चेष्टामस्करीसाठी फोन करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दररोज २५ ते ३० हजार कॉल येत होते़ आता त्यांची संख्या एकदम १ हजार ते दीड हजारांपर्यंत कमी झाली़ त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष खरंच मदतीची गरज आहे, त्यांना तातडीने मदत मिळणे शक्य होऊ लागले आहे़पुणे पोलिसांनी १०० नंबर डायल कार्यप्रणालीला इंटरअ‍ॅक्टिव्ह रिस्पॉन्स सिस्टीम बसविल्यामुळे अनावश्यक फोनच्या संख्येत मोठी घट झाली आहे़ त्याचबरोबर इतक्या प्रचंड संख्येने येणारे अनावश्यक कॉल बंद झाल्याने नियंत्रण कक्षातील कर्मचाºयांवरील ताणही कमी झाला आहे़ पोलीस नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक डुंबरे यांनी सांगितले, की १०० क्रमांक हा मोफत आहे. काही जण मुद्दाम रात्री-अपरात्री कॉल लावून काहीही न बोलता तसाच हातात धरून ठेवत़ ब्लॅँक कॉलची संख्या १४ ते १५ हजार होती़ काही जण कॉल केल्यावर रिंग वाजली की फोन ठेवून देत़ अशा मिस्ड कॉलची संख्या त्याच्याखालोखाल होती़ ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, अशा कॉलची संख्या सुमारे ५०० च्या आसपास असते़ हे लक्षात घेऊन पोलिसांनी ही यंत्रणा सुरू केली.कशी चालते ही सिस्टीम...या सिस्टीमनुसार जेव्हा नागरिक १०० नंबरवर फोन करतील तेव्हा त्यांना प्रथम ‘जयहिंद पुणे पोलीस कृपया आपल्या मदतीसाठी एक दाबा’ असे हिंदी, इंग्रजी व मराठीतून ऐकविले जाते़ त्याप्रमाणे नागरिकांनी कार्यवाही केल्यावर त्यांचा कॉल १०० नंबरला जोडला जाऊन त्यांना तत्काळ मदत पुरविली जाते़ तसेच त्यांना योग्य मदत मिळाली व त्यांचे समाधान झाले किंवा नाही याचा पाठपुरावासुद्धा नियंत्रण कक्ष अधिकाºयांकडून घेतला जातो़या सिस्टीममुळे अनावश्यक कॉल करणारे जयहिंद हा शब्द ऐकल्यानंतर पुढे कॉल चालू ठेवत नाहीत, असे लक्षात आले़ त्यामुळे कॉलच्या संख्येत मोठी घट झाली़ही कार्यप्रणाली यशस्वीपणे राबविण्यासाठी पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, सहायक पोलीस आयुक्त दीपक डुंबरे, अभियान संस्थेचे वैभव गिव्हरे, सारंग पंडित, दीपक सापटे, नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी आश्लेषा माने, माधुरी अनमुले व स्नेहल केकडे यांनी परिश्रम घेतले़अश्लील संभाषण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखलनियंत्रण कक्षाला रात्री-अपरात्री फोन करून तेथे नेमणुकीस असलेल्या महिला कर्मचाºयांशी असभ्य व अश्लील भाषेत संभाषण करणाºया चौघांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जे नागरिक अथवा त्यांची लहान मुले विनाकारण १०० नंबरला फोन करून मिस कॉल देत होते, त्यांनाही त्यांच्या फोनवर फोन करून पोलिसांनी समज दिली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे