शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जय मल्हार! जेजुरीत यंदा शिखर काठ्यांचा जल्लोष नाही; कोविडमुळे यात्रा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 11:05 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीत दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते.

ठळक मुद्देप्रातिनिधिक स्वरूपात मानाच्या शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत आज शिखर काठ्यांची यात्रा संपन्न झाली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी भरणारी माघ पौर्णिमेची यात्रा रद्द झाल्याने शिखरी काठ्यांचा जल्लोष नव्हता.  केवळ संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर यांच्या फक्त मानाच्या एकाच काठीने आज देवदर्शन उरकले.

सकाळी संगमनेरकर होलम आणि दुपारी सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर यांच्या शिखरी काठ्यांनी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत गडकोटात जाऊन येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात,भंडाऱ्याची उधळण करत देवभेटी उरकल्या. काठीसोबत फक्त १० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता. 

तीर्थक्षेत्र जेजुरीत दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. राज्यभरातून लाखांवर भाविक येथे येऊन कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेत असतात.  यात्रा दोन दिवस सुरू असते. कोविड प्रादुर्भावामुळे यंदा प्रशासनाने ही यात्रा रद्द केली होती. यामुळे यंदा यात्रा भरली नसली तरीही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होणारी शिखरी काठ्यांचा पारंपरिक देवभेटीचा सोहळा अगदी मोजक्याच भाविकांच्या आणि केवळ मानाच्या काठीच्याच देवभेटीने संपन्न झाला. 

पोलिसांनीही यात्राकाळात चार पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जेजुरीकरांनी प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला होता. यात्रा शांततेत पार पडली.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस