शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

समाजमन जाणण्यासाठी सायकलवरून जगभ्रमंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 4:42 AM

जगभरातील संस्कृती जाणून घेण्यासाठी ते सायकलवरून जगभ्रमंती करण्यासाठी निघाले आहेत. नुकतेच ते पुण्यात आले असून, त्यांना भारतीय संस्कृती खूप आवडली आहे. समाजमन जाणण्यासाठी मी जगभ्रमंती करीत असल्याचे झेकोस्लोवाकियातील उच्चशिक्षित डॅनियल स्मिथ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

- जयवंत गंधालेहडपसर : जगभरातील संस्कृती जाणून घेण्यासाठी ते सायकलवरून जगभ्रमंती करण्यासाठी निघाले आहेत. नुकतेच ते पुण्यात आले असून, त्यांना भारतीय संस्कृती खूप आवडली आहे. समाजमन जाणण्यासाठी मी जगभ्रमंती करीत असल्याचे झेकोस्लोवाकियातील उच्चशिक्षित डॅनियल स्मिथ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॅनियल स्मिथ सध्या जगभ्रमंती करीत आहेत. सायकलिंग करणारे भारतातील लोक त्यांचा पाहुणचार करीत आहेत. हडपसर येथील डॉ. वैभव दांगड यांच्या घरी ते आले आहेत. दिल्लीहून ते सध्या पुण्यात आले आहेत. त्याच्या या मोहिमेबाबत ‘लोकमत’ने जाणून घेतले.डॅनियल स्मिथ यांनी बायो फिजिक्स केले असून, त्यानंतर पीएचडी केली. त्यांनी ओस्तावा युनिव्हर्सिटीमधून पीएचडी मिळविल्यानंतर सायकलवरून जगभ्रमंतीला १९ मे २०१७ रोजी सुरुवात केली. आतापर्यंत १२ हजार ५०० किमी प्रवास झाला आहे. झेक प्रजासत्ताक, पोलंड, लुथॅनिया, लॅटेनिया, रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तानमार्गे दिल्ली येथे पोहोचले. त्यानंतर जयपूर, अजमेर, चित्तोडगड, उदयपूर, गांधीनगर, बडोदा, सुरत, दमण, मुंबई, लोणावळामार्गे पुण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. पुण्यातून हैदराबाद, कोलकाता असा पुढील प्रवास आहे. आणखी एक वर्षांत जपानमध्ये पोहोचण्याचा संकल्प केला आहे.प्रवासादरम्यान, स्मिथ यांची १७ किलो वजनाची सायकल असून, ५-१० लिटर पाणी, जॅकेट, सायकलचे स्पेअरपार्ट, तंबू, मॅट्रेस असे ४० किलो वजनाचे साहित्य आहे. रशियामध्ये अनेक खेड्यांमध्ये पहिल्यांदाच परदेशी माणूस पोहोचल्याचे आश्चर्याने त्यांनी सांगितले. जगभरातील माहिती इंटरनेटवर मिळते. मात्र, बोहरी, मुस्लिम, ज्यू अशा अल्पसंख्याक समुदायाविषयी त्याला आस्था आहे. त्याच्यावर त्याने अभ्यास करण्याचे ठरवल्याने तो हा जगप्रवास सायकलवरून करीत आहेत.खेडेगावातील जग पाहायचं आहेदेश-परदेशात सायकलवरून प्रवास करीत असताना तापमानाचा काहीसा परिणाम झाला. उझबेकिस्तानमध्ये मांसाहारी पदार्थांचा काहीसा त्रास झाला. कझाकिस्तानमध्ये निर्मनुष्य जंगलामध्ये प्रवास करीत असताना तंबू टाकून मुक्काम केला. त्या वेळी जंगली घोड्यांचा सहवास त्यांना लाभला असल्याचे सांगून ते म्हणाले, की कुत्रा आणि घोडा हे इमानी आहेत, याची प्रचिती या जंगलामध्ये आली. जंगली प्राण्यांपेक्षा भरधाव वाहनांची जास्त भीती वाटते. उझबेकिस्तान व भारतामध्ये महाराष्टÑ आणि गुजरातमध्ये वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैशी आहे. उलटपक्षी राजस्थानमध्ये नियम पाळले जात असल्याचे अनुभव आला.भारतीय जेवणाचा आस्वादभारतीय पद्धतीच्या जेवणाचे कौतुक वाटते. बाजरीची भाकरी, पिठलं, पुरणपोळी, बिर्याणीसारखी मेजवानी उत्तम असल्याचे स्मिथ यांनी सांगितले. इतर देशांपेक्षा भारतामध्ये अनेक भाषा, संस्कृती वेगळी आहे, तरीही एकोपा असल्याचे पाहून समाधान वाटत आहे.मात्र, काही अल्पसंख्याक समुदायाची संस्कृती आणि भाषा लोप पावत असल्याचे पाहायला मिळत आहे. रशियासारखे देश अल्पसंख्याकासाठी भरीव मदत करीत आहेत. रशियामध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे पाहून समाधान वाटते आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे