इस्कॉनतर्फे जगन्नाथाची रथयात्रा

By Admin | Updated: January 9, 2017 03:14 IST2017-01-09T03:14:59+5:302017-01-09T03:14:59+5:30

पुणे शहरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) अध्यक्ष कृष्णकृपाश्रीमूर्ती राधेशाम, रेवती पती, आनंद मुरारी

Jagannatha Rath Yatra by ISKCON | इस्कॉनतर्फे जगन्नाथाची रथयात्रा

इस्कॉनतर्फे जगन्नाथाची रथयात्रा

पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) अध्यक्ष कृष्णकृपाश्रीमूर्ती राधेशाम, रेवती पती, आनंद मुरारी, श्वेतदी आणि समस्त शहराच्या नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने हरे कृष्ण महोत्सव व भव्य जगन्नाथ रथयात्रेचे न्यू इंग्लिश स्कूल या परिसरातून जगन्नाथ रथयात्रा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महापौर प्रशांत जगताप, शिवाजी निलंगेकर, जी. बी. सी. लोकनाथ स्वामी आदींची उपस्थिती होती. यादरम्यान दुपारी २ ते ७ वाजता न्यू इंग्लिश स्कूल ते ओंकारेश्वर मंदिरपर्यंत भव्य-दिव्य अशी हरे कृष्णा रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेमध्ये हजारो भक्तगण तनमनधन अर्पण करून मोठ्या भक्तिभावाने कृष्णाचे नामस्मरण करत तल्लीन होऊन वाद्यांच्या तालावर नाचताना दिसत होते. दरम्यान, शहरातील वातावरण प्रसन्न झाले होते. प्रत्येक जण या रथयात्रेमध्ये सामील होत होता व आनंद लुटत होता. तसेच रथयात्रेच्या मार्गावर अनेक मंडळांनी पाणी, ज्यूस, फळे यांचे वाटप केले.

Web Title: Jagannatha Rath Yatra by ISKCON